70 वर्षांच्या आजीबाईंकडे गावगाडा, कातकरी समाजातील शेवंतीबाई सरपंचपदी

ओवळी गावातील आदिवासी कातकरी वस्तीत जवळपास 30 ते 35 घरं आहेत. या वस्तीमधल्या 70 वर्षांच्या शेवंती पवार सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत (Ratnagiri 70 years old Sarpanch)

70 वर्षांच्या आजीबाईंकडे गावगाडा, कातकरी समाजातील शेवंतीबाई सरपंचपदी
70 वर्षांच्या सरपंच शेवंती पवार
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 10:04 AM

रत्नागिरी : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि त्यांचे निकालही लागले. त्यानंतर सरपंचपदाची आरक्षण सोडतही झाले. काही गावांमध्ये पती-पत्नी सरपंच आणि उपसरपंचपदावर विराजमान झाले. तर काही गावात तरुण-तरुणींच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यामधल्या ओवळी गावात 70 वर्षांच्या आजीबाई सरपंच बनल्या आहेत. आदिवासी कातकरी समाजामधील 70 वर्षांच्या आजीबाई आता पुढील पाच वर्षे ओवळी गावाचा कार्यभार पाहणार आहेत. (Ratnagiri Owali Gram Panchayat 70 years old Sarpanch Shevanti Pawar)

70 वर्षांच्या शेवंती पवार सरपंचपदी

ओवळी गावातील आदिवासी कातकरी वस्तीत जवळपास 30 ते 35 घरं आहेत. या वस्तीमधल्या 70 वर्षांच्या शेवंती पवार सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. या आजीबाई संसाराचा गाडा हाकता हाकता आता गावागाडाही हाकणार आहेत. गावकऱ्यांनी विश्वासाने त्यांच्या खांद्यावर गावाची जबाबदारी सोपवली आहे. गावकऱ्यांच्या विश्वासाला मान देत आजीबाईंनी ओवळी गावाच्या विकासकामाची जबाबदारी स्वीकारली आहे.

केवळ चिपळूण तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्हात आदिवासी कातकरी समाजातील आमची आजीबाई सरपंच झाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया वस्तीमधील गावकऱ्यांनी दिली आहे.

चुलीवर स्वयंपाक आटोपून ग्रामपंचायतीत

या आजी आपल्या घरात चुलीवरचा स्वयंपाक आटोपून घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीकडे चालत जातात आणि चालत येतात. 70 वर्षांचा अनुभव उराशी बाळगून गावतील पाणी, रस्ते आणि विविध समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडवण्याचा ध्यास त्यांच्यासमोर आहे. शिवाय गावातील शाळेबाबतचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा गावकरी करत आहेत.

या आजीबाईनी पुढील पाच वर्षांत गावचा कायापालट केला तर इतिहासच घडेल. खरंतर आदिवासी कातकरी समाज अजूनही मागेच आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 70 वर्षांच्या आजी सरपंच बनल्याने ओवळी गावात इतिहास रचला आहे. (Ratnagiri Owali Gram Panchayat 70 years old Sarpanch Shevanti Pawar)

दौंड तालुक्यातील सर्वात तरुण सरपंच

दौंड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल संजय काळभोरची निवड झाली आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी स्नेहल बिनविरोध सरपंचपदी निवडून आली. त्यानंतर तिची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून स्नेहल काळभोर खडकी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडून आली होती. आता बोनस म्हणजे तिच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरुण सरपंच होण्याचा मानही स्नेहल काळभोरला मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

कारभारी लयभारी… मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपेक्षा भारदस्त, अहमदनगरमध्ये सरपंचाची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

ग्रामपंचायतचा ‘नगरी पॅटर्न’, आजोबा, वडिलांनतर आता बायको, 55 वर्षे सरपंचपद भूषवणारं कुटुंब

(Ratnagiri Owali Gram Panchayat 70 years old Sarpanch Shevanti Pawar)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.