रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या जागेवरुन महायुतीत महासंघर्ष होणार?

उदय सामंत यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्य़ा. नारायण राणे काय भूमिका घेणार?. किरण सामंत यांच्या उमेदवारीवरून रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या जागेवरुन महायुतीत महासंघर्ष होणार?
uday samantImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 4:33 PM

चिपळूण : लोकसभा निवडणुकीसाठी वर्षभरापेक्षा कमी कालावधी उरला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विनायक राऊत विद्यमान खासदार आहेत. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून विनायक राऊत, शिवसेना (शिंदे गटाकडून) किरण सामंत आणि भाजपाकडून निलेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या लोकसभा जागेसंबंधी मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे.

“किरण सामंत हे माझे सख्खे भाऊ आहेत. मात्र त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण ते निवडणुकीला उभे राहिले, तर त्यांना तीन ते साडेतीन हजार मतांनी निवडून आणू” असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत.

तर महायुतीत तणाव वाढणार?

किरण सामंत यांच्या उमेदवारीवरून रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. शिंदे गटाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला, तर महायुतीमध्ये तणाव वाढू शकतो. कारण सिंधुदुर्गमध्ये अजूनही नारायण राणे यांच बऱ्यापैकी वजन आहे. नारायण राणे यांचं वर्चस्व होतं

सिंधुदुर्गात आधी नारायण राणे यांचं वर्चस्व होतं. पण 2014 नंतर हा बालेकिल्ला ढासळला. 2014 मध्ये आधी नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर विधानसभेला कुडाळमधून नारायण राणे यांचा पराभव झाला. लोकसभेला शिवसेनेचे विनायक राऊत आणि विधानसभेला शिवसेनेचे वैभव नाईक आमदार झाले. फक्त कणकवली विधानसभेची जागा नितेश राणे यांच्याकडे आहे. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या रुपाने भाजपाकडे एक वजनदार नेता आहे. पण महायुतीच्या या जागेवरुन रस्सीखेच होऊ शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.