मोदींना रावण म्हंटल्यावर गुजरातचा अपमान होतोय तर शिवाजी महाराजांवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान होत नाही का ? राऊत भडकले
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असतांना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचा एक संदर्भ देत महाराष्ट्राचा अपमान झाला आहे हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिक : कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंभर तोंडाचा रावण असल्याचे म्हंटले होते, त्यावर मोदींनी अश्रु ढाळत हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान आहे असं म्हंटलं होतं. तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यावर महाराष्ट्राचा अवमान होत नाही का ? असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केला आहे. संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या विधानावरून चांगलाच घणाघात केला आहे. संपूर्ण राज्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. त्यांचा निषेध ठिकठिकाणी केला जात असून राज्यपाल हटाव ही मोहिमही राज्यात सुरू झाली आहे. पुण्यात राज्यपाल यांच्या ताफ्याला राजकीय पक्षांसह संघटनांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यपाल यांच्या वादग्रस्त विधानावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असतांना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचा एक संदर्भ देत महाराष्ट्राचा अपमान झाला आहे हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे, क्रांती केली म्हणताय तर वानती झाली काय ? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
गुजरातच्या प्रचार सभेत कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या विधानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्रु ढाळत सांगितलं होतं मला रावण म्हणले आहे हा माझा अपमान नाही तर गुजरातचा अपमान आहे.
त्यावर संजय राऊत यांनी तोच धागा पकडून संजय राऊत यांनी मलाही ते बोलले आवडले नाही, पण दुसरींकडे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललं तर अपमान होत नाही म्हणून संजय राऊत यांनी भाजपवर निशाण साधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील हेच का तुमचं प्रेम ? हीच का तुमची आस्था असे सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.