AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udayanraje Bhosale : फेकून टाका वाघ्या कुत्रं, लांब कानाचं कुत्रं इंडियामध्ये…काय म्हणाले उदयनराजे?

Udayanraje Bhosale : रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरुन सुरु असलेल्या वादावर खासदार उदयनराजे भोसले यांनी एकदम रोखठोक भूमिका घेतली आहे. त्याशिवाय 'फुले' चित्रपटावरुन सुरु असलेला वाद आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीला उपचार नाकारणं यावरही ते बोलले आहेत.

Udayanraje Bhosale : फेकून टाका वाघ्या कुत्रं, लांब कानाचं कुत्रं इंडियामध्ये...काय म्हणाले उदयनराजे?
Udayanraje BhosaleImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2025 | 11:37 AM

“छत्रपती शिवाजी महाराजांच राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं. मुंबईत अरबी समुद्रात पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्मारकाच भूमीपूजन झालं. मी सुद्धा त्यावेळी तिथे होतो. कदाचित पर्यावरणामुळे तिथे करता येत नसेल, तर गर्व्हनर हाऊसची जागा आहे. ही जवळपास 48 एकर जागा आहे. एखाद्या राज्यपालाला रहायला किती जागा लागते?. 48 एकर थोडी जागा नाही. ही जागा अरबी समुद्राला लागून आहे. त्या संदर्भात मी अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे” असं खासदार उदयनराजे म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महराजांच राज्य हे रयतेच राज्य म्हणून ओळख होती. आज आपण ज्या लोकशाहीच वावरतो, त्याचा ढाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत, त्याला कुठल्याही पैशाची किंवा बजेटची आवश्यकता नाही” असं उदयनराजे भोसले म्हणाले.

‘फुले’ चित्रपटाच्या वादावर काय म्हणाले?

महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर येणाऱ्या ‘फुले’ चित्रपटाबद्दल सुद्धा उदयनराजे बोलले आहेत. सेन्सॉर बोर्डाने त्यातील काही संवाद आणि दृश्यांवर कात्री चालवली आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले की, “जे महाराजांना लागू होतं, ते महात्मा फुलेंना सुद्धा. महाराजांपेक्षा कोणी मोठा नाही. ज्यांनी महाराजांच्या विचारांच अनुकरण केलं, त्या सर्वांना लागू होतं. इतिहासकाराचं एक सेन्सॉर बोर्ड निर्माण करा. जे काय कट करायचं ते ठरवतील” असं उदयनराजे म्हणाले. छावा चित्रपटावरुन झालेल्या वादावर सुद्धा त्यांची हीच भूमिका होती.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय म्हणाले?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरुन सुरु असलेल्या वादावरही उदयन राजे बोलले आहेत. “चॅरिटेबल म्हणजे काय, ही शासनाची जागा आहे. किमान 50 ते 70 मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असतील, किती चॅरिटी करतात ते. त्यांना ही जागा फ्री मध्ये दिली आहे. गरजूंवर मोफत उपचार झाले पाहिजेत. असं कोणी करत नाही, याचं ऑडिट झालं पाहिजे” असं उदयनराजे म्हणाले.

वाघ्या कुत्र्याच्या वादावर काय म्हणाले?

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरुन सुरु असलेल्या वादावर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. “वाघ्या ते कुत्र बघा, ते इथलं तरी आहे का? लांब कानाचं कुत्रं इंडियामध्ये बघितलय का? ही ब्रिटिश कुत्री आहे. फेकून टाका, जास्त कौतुक कशाला हवं” असं उदयनराजे म्हणाले.

दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd.
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय.
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?.
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह.
ऑपरेशन सिंदूरआधी मोदींच्या 45 गुप्त बैठका, सौदीत दौऱ्यातच ठरवलं अन्...
ऑपरेशन सिंदूरआधी मोदींच्या 45 गुप्त बैठका, सौदीत दौऱ्यातच ठरवलं अन्....
'गोकुळ'च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत
'गोकुळ'च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत.