ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच: रेणू शर्मा

रेणू शर्मा यांनी सलग ट्विट् करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवर रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी ब्लॉक का केलं होत? याचा जाब विचारण्याचा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला आहे. (Renu Sharma Dhananjay Munde)

ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच: रेणू शर्मा
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 8:21 AM

मुंबई :  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यानंतर रात्री रेणू शर्मा यांनी सलग ट्विट् करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवर रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी ब्लॉक का केलं होत? याचा जाब विचारण्याचा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला आहे. तसेच, पोलीस जेव्हा या गोष्टीचा तपास करतील तेव्हा या सगळं काही समोर येईल, असंही त्यांनी म्हटलंय. (Renu Sharma alleges that Dhananjay Munde as blocked her on tweet)

गायिका रेणू शर्मा यांनी मंगळवारी (12 जानेवारी) धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय. पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्रभर एकच खळबळ उडाली. तसेच, समाज माध्यमांवार दिवसभर याच गोष्टीची चर्चा सुरू होती. या प्रकारानंतर काहींनी धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांचे समर्थन केले. तर काहींनी रेणू शर्मा यांची बाजू घेत त्यांना न्याय देण्याची मागणी केली.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा @TV9Marathi वर

त्यानंतर रेणू शर्मा यांनी सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले. धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय?, असा सवाल रेणू यांनी केला. तसेच, पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलंय. या प्रकरणाचा पोलीस जेव्हा सखोल तपास करतील तेव्हा सगळं काही समोर येईलच असं म्हणत त्यांनी या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

रेणू शर्मा यांचे ट्विट काय?

रेणू शर्मा यांचे ट्विट काय?

करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात : धनंजय मुंडे

दरम्यान, हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फक्त बदनामी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी हे सगळं काही होत असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांची बाजू मांडली आहे. रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा यांच्यासोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. करुणा शर्मा या रेणू शर्मा यांच्या बहीण आहेत. तसेच, परस्पर सहमतीच्या संबंधामधून करुणा शर्मायांच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये असल्याचेही त्यांनी म्हटलंय. सदर दोन्ही मुलांना मुंडे यांनी त्यांचे नाव दिल्याचे सांगत सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव असल्याचं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिलंय.

2019 पासून करूणा शर्मा, रेणू शर्मांकडून ब्लॅकमेलींग

धनंजय मुंडे यांनी पुढे करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्याकडून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचा आरोप केलाय. “2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या,” असं मुंडे यांनी म्हटलंय. तसेच, या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान, मुंडे यांच्यावर झालेल्या या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. कोणी रेणू शर्मा यांना न्याय देण्याची मागणी करत आहे. तर कणी मुंडे यांच्यावरील आोरोप बिनबुडाचे असून फक्त फसवण्यासाठी हे सगळं केलं जात असल्याचं म्हणत आहेत.

संबंधित बातम्या :

बलात्कार प्रकरण भोवणार?; धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांनाच पत्रं

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

(Renu Sharma alleges that Dhananjay Munde as blocked her on tweet)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.