कुत्र्यांच्या तावडीतून शेकरुला सोडवलं, पण वनकर्मचाऱ्यालाच चावला, हात केला रक्तबंबाळ

या शेकरुच्या पाठी कावळे लागले होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर वनखात्याच्या लोकांना पाचारण करण्यात आले. मात्र, कावळे शेकरुचा पिच्छा काही सोडत नव्हते. | Shekru giant squirrel

कुत्र्यांच्या तावडीतून शेकरुला सोडवलं, पण वनकर्मचाऱ्यालाच चावला, हात केला रक्तबंबाळ
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 5:24 PM

सिंधुदुर्ग: कणकवली-तळेरे येथे दुर्मिळ शेकरूच्या चाव्यात वनरक्षक जखमी झाल्याची घटना घडली.कणकवली तालुक्यातील तळेरे बसस्थानकातील झाडावर बुधवारी सकाळी शेकरु (Shekru) प्राणी आढळला. कावळ्यांनी या शेकरुला गराडा घालून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक मुलांनी हे बघितल्यानंतर त्याठिकाणी वनखात्याला तातडीने पाचारण करण्यात आले. तब्बल एक तासाच्या घडामोडीनतंर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून शेकरुला जीवदान दिले . तळेरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शेकरुवर प्राथमिक उपचार केल्यानंतर फोंडाघाट वनक्षेत्रात त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. (Rescue mission of Shekru giant squirrel in Kankavli)

आज सकाळी तळेरे बसस्थानकाच्या आवारात एका झाडावर शेकरु आढळून आला. या शेकरुच्या पाठी कावळे लागले होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर वनखात्याच्या लोकांना पाचारण करण्यात आले. मात्र, कावळे शेकरुचा पिच्छा काही सोडत नव्हते. शेकरु झाडावर असल्यामुळे त्याला पकडताही येत नव्हते. कावळ्यांना चुकवण्याच्या नादात शेकरु झाडावरुन खाली पडले. तेव्हा कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वनरक्षक रानबा बिक्कड यांनी शेकरुला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवत त्याला पकडले. मात्र, या नादात शेकरुने त्याच्या हाताचा कडकडून चावा घेतला. यामुळे रानबा बिक्कड यांचा हात रक्तबंबाळ झाला. मात्र, तरीही रानबा बिक्कड यांनी शेकरुला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळवले.

जखमी वनरक्षक बिक्कड यांची जखम खोल असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर शेकरुलाही मार लागल्याने त्यांच्यावर तळेरे पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. यानंतर त्या शेकरूला फोंडाघाट येथे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

संबंधित बातम्या:

कोथरुडच्या सोसायटीत शिरला रानटी गवा, पुणेकरांची गर्दी

मानवी वस्तीत आलेल्या रानगव्याचा पुणेकरांच्या हुल्लडबाजीने घेतला जीव; पुण्यात सहा तासांचा थरार!

(Rescue mission of Shekru giant squirrel in Kankavli)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.