रिक्षाचालक ते आमदार, जाणून घ्या कोण आहेत गणपत गायकवाड

Ganpat Gaikwad news : आमदार गणपत गायकवाड सध्या एका घटनेमुळे राज्यातच नाही तर देशभरात चर्चेत आले आहेत. एका संयमी आमदाराने इतके टोकाचे पाऊस का उचलले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गणपत गायकवाड हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. जाणून घ्या कोण आहेत गणपत गायकवाड.

रिक्षाचालक ते आमदार, जाणून घ्या कोण आहेत गणपत गायकवाड
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 4:18 PM

कल्याण : कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड सध्या एका वादामुळे चर्चेत आले आहेत. शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने ते सध्या देशभरात चर्चेत आहेत. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. अतिशय संयमी आणि शांत नेते म्हणून ओळख असलेले गणपत गायकवाड यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न सगळीकडेच विचारला जात आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे.

गणपत गायकवाड हे सलग तीन वेळा कल्याण पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत. २००९ आणि २०१४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

जनता दरबार

गणपत गायकवाड हे दर रविवारी जनता दरबार चालवतात. या माध्यमातून ते लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही अडचणी असले की नागरिक या जनता दरबारात येतात. कल्याण पूर्वेत कोणतीही समस्या सोडवण्यासाठी दिलेला शब्द पाळतात अशी त्यांची ओळख आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क वाढला आहे.

आमदारकीचा पगार गरजु विद्यार्थ्यांना

आमदार गणपत गायकवाड हे त्यांना आमदार म्हणून मिळणारा पगार हा गरजू विद्यार्थ्यांना देत असतात. त्यामुळे मतदारसंघात देखील त्यांची बरीच चर्चा असते. वाढदिवशी देखील ते भेट म्हणून शिक्षण उपयोगी वस्तू देण्याचा आग्रह धरतात. जेणेकरुन ते त्या गरजू विद्यार्थ्यांना मिळू शकतील.

या शिवाय गरजुंना मोफत औषधे, दरवर्षी विविध शिबिरे आणि मतदारसंघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मदत याबाबतीत ही ते पुढे असतात.

रिक्षाचालक ते आमदार

आमदार गणपत गायकवाड यांनी सुरवातीला उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा देखील चालवली असल्याचं म्हटलं जातं. यानंतर आमदार गणपत गायकवाड केबलच्या व्यवसायात आले. केबलच्या व्यवसायात त्यांनी बरीच प्रगती केली. यशस्वी उद्योजक झाल्यानंतर त्यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन वेळा ते अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

द्वारली गावात एकनाथ जाधव यांच्या मालकीचा भूखंड गणपत गायकवाड यांच्या कंपनीने १९९६ साली विकत घेतला होता. तीन वेळा पैसे दिल्यानंतर एकनाथ जाधव कुटुंब हे नोंदणी कार्यालयात येत नसल्याने गणपत गायकवाड यांनी न्यायालयीन लढाई लढून या भूखंडाची मालकी मिळवली होती. त्यानंतर या भूखंडाला कुंपण घालण्याचे काम सुरु असतानाच शुक्रवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांसोबत महेश गायकवाड यांनी या भूखंडावर कुंपणाचे नुकसान केले. त्यानंतर याची तक्रार दाखल करण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. हिललाईन पोलीस ठाण्याच्या कर्मचारी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे वैभव गायकवाड यांनी आमदार गणपत गायकवाड यांना सांगितले.

यादरम्यान महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे देखील पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड हे देखील या ठिकाणी पोहोचले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात दोन्ही गट बसले होते. या दरम्यान वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड समर्थकांमध्ये बाहेप वाद झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप वाद मिटवण्यासाठी बाहेर गेले. त्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली.

महेश गायकवाड यांच्यावर ही गुन्हा दाखल

माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. राहुल पाटील आणि अन्य 70 जणांच्या विरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठलीही परवानगी न घेता जागेवर कब्जा करण्यासाठी सशस्त्रपणे मोठ्या संख्येने जमा झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगारांना शिवीगाळ करत जागेवरील सामानाचे नुकसान केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. या गुन्ह्यात तीन महिलांचाही समावेश असून हिल लाईन पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला आहे. महेश गायकवाड, राहुल पाटील यांची देखील पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.