सिंधुदुर्गात आदिमानवाच्या पाऊलखुणा? साळशीतील माळरानावर कोरीव कातळशिल्प
देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळरानावर ऐतिहासिक कोरीव कातळशिल्प आढळून आले आहे. Salashi rock sculptures
सिंधुदुर्ग : आदिमानवाच्या पाऊलखुणा आता कोकणच्या माळरानावर सापडू लागल्या आहेत. देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळरानावर कोरीव कातळशिल्प आढळून आले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या साळशी गावाचे यामुळे महत्व आणखी वाढले आहे. पुराणात सप्त पाताळांचा उल्लेख सापडतो. त्यामुळे या ठिकाणी कैक वर्षांपासून प्रगत लोकवस्ती असल्याचे यामुळे समोर येत आहे. ( Rock sculptures found in Salashi village of Sindhudurg district)
प्रागैतिहासिक काळातील संस्कृती?
कातळशिल्पाच्या माध्यमातून अधोरेखित झाली आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड असलेतरी विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे कोरली आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात.
कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये अशी शिल्पे आढळून येत आहेत.मात्र, देवगडमधील साळशी गावाच्या माळरानावर सापडलेल्या कातळशिल्पा बरोबरच या गावाला ऐतिहासिक महत्व देखील आहे. हे गाव आदिलशाहीपासून तालुक्याचं ठिकाण म्हणून ओळखलं जात होत. स्वराज्यात सामील झाल्यानंतर या गावाचा दबदबा आणखी वाढला. याठिकाणचे पावणाई देवीचे मंदिर हे ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराची भव्यदिव्यता इतिहासाच्या पार्श्वभूमीची साक्ष देतात. याशिवाय अनेक अशा ऐतिहासिक पाऊलखुणा या भागात सापडत, असल्याची माहिती संतोष गावकर यांनी दिली आहे. कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचेही गावकर यांनी सांगितले. ( Rock sculptures found in Salashi village of Sindhudurg district)
साळशीच्या माळावर आता आदिमानवाच्या पाऊलखुणांची साक्ष देणारे कातळशिल्प सापडले आहे. विशेष म्हणजे शिल्पाच्या बाजूला काही अंतरावर भलीमोठी कातळात कोरलेली गुहादेखील आहे. त्यामुळे या ठिकाणी आदिमानवाची वस्ती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
साळशीत सापडलेल्या या कातळशिल्पामुळे हा अश्मयुगीन ठेवा असू शकतो त्यामुळे यावर संशोधन होऊन साळशी गाव पर्यंटन दृष्ट्या जगाच्या नकाशावर येण्याची गरज आहे. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये यापूर्वी कातळशिल्प आढळली आहेत. साळशी गावातील युवकांना कातळशिल्प आढळली आहेत. आजूबाजूच्या कातळशिल्पांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विचार करणं गरजेचे आहे, असं प्रणव नाडनकर यांनी सांगितले. ( Rock sculptures found in Salashi village of Sindhudurg district)
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 29 November 2020https://t.co/HytvxAxxvp
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 29, 2020
संबंधित बातम्या :
TOURISM | सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यावरचे वॉटर स्पोर्ट्स सुरु; पर्यटकांना लुटता येणार आनंद
Sindhudurg | सिंधुदुर्गातील आंबोली हिल स्टेशनवर पर्यटकांची स्टंटबाजी
( Rock sculptures found in Salashi village of Sindhudurg district)