उर्फीचं प्रकरण तापलं! चित्रा वाघ यांच्या आरोपावर महिला आयोगानेच वाघ यांना पाठवली नोटिस, रूपाली चाकणकर काय म्हणाल्या ?

उर्फीच्या प्रकरणावर महिला आयोगासह रूपाली चाकणकर यांच्यावर आरोप करणं चित्रा वाघ यांना अडचणीचे ठरू शकते, पत्रकार परिषद घेत रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना स्पष्टच सुनावलं आहे.

उर्फीचं प्रकरण तापलं! चित्रा वाघ यांच्या आरोपावर महिला आयोगानेच वाघ यांना पाठवली नोटिस, रूपाली चाकणकर काय म्हणाल्या ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 4:59 PM

पुणे : उर्फी जावेद हीच्या व्हिडिओवरुण चित्रा वाघ या आक्रमक झाल्या होत्या. त्यावर रूपाली चाकणकर यांच्यासह महिला आयोगावर आरोप केला होता. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांचीच अडचण वाढवून दिली आहे. चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटिस बजावून दोन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे सांगितलं आहे. त्यात चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची बदनामी केली आहे, महिला आयोगाची गरिमा राखली नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे. राज्य महिला आयोगाला 25 जानेवारीला 30 वर्ष पुर्ण होतायेत. राज्यात वेगवेगळे उपक्रमाचं आयोजन करण्यात येतंय. काल पत्रकार परिषद झाली त्यावर राज्य महिला आयोगावर टिका करण्यात आली. महिला आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. तक्रार आल्यानंतर विधी विभागाशी चर्चा करून निर्णय घेतो. काल पत्रकार परिषदेत खोटी माहिती ही पत्रकारांना दिली असे चाकणकर म्हणाले आहे.

राज्य महिला आयोगानं तेजस्विनी पंडीत यांना पाठवलं नाही, संजय जाधवांना पत्र दिलं आहे अनुराधा या मालिकेसंदर्भात पाठवलं होतं. संजय जाधवांनी उत्तर आयोगाला पाठवलं होतं .

हे सुद्धा वाचा

अनेक पालकांनी वेब सिरिजच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या, चित्रा वाघ यांनी चुकीची माहिती दिली, पंडीतला महाराष्ट्राची लेक म्हणून दिली जावेदला दिली नाही, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी ही टिका केली.

आम्ही चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना नोटीस मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. महिला आयोगाची अप्रतिष्ठा केली आहे. आयोगाच्या कामकाजाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल असं वक्तव्य केलन आहे.

आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी राज्य महिला आयोग नोटीस पाठवत आहे. दोन दिवसांत खुलासा करावा दोन दिवसांत खुलासा केला नाही तर म्हणणं नाही म्हणून एकतर्फी कारवाई करेल.

चित्रा वाघ यांना इशारा देत भारतीय संविधानानं व्यक्तीस्वातंत्र्य दिलं आहे. उर्फीचं समर्थन कोणी करावं हे त्यांनी सांगायचं गरज नाही. चित्रा वाघ या काही काळ आयोगाच्या सदस्या होत्या, त्यामुळे अध्यक्ष कसा निवडला जातो याचा अभ्यास कमी पडला.

त्यामुळे अशा विषयात वेळ वाया घालवणं गरजेचं नाही, मास्टर माईंड कोण याबाबत त्या नेहमी बोलतात पण रघुनाथ कुचिक प्रकरणात त्या तोंडावर पडल्या, संजय राठोड प्रकरणात तोंडावर पडल्या.

मुंबई पोलिसांना भेटायला गेल्या, बालीशपणाची दखल पोलिसांनी घेतली नाही, योग्य वेळ म्हणजे कोणती वेळ सांगून टाका, मास्टर माईंड काय हे त्यांनी एकदा सांगून द्यावे असेही चाकणकर म्हणाल्या आहेत.

गृह विभाग त्यांच्याकडे असूनही दखल घेतली जाण नाही, हा त्यांचा बालीशपणा असावा असा टोला रूपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.