Russia Ukraine War : महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले, 300 विद्यार्थ्यांशी संपर्क; राज्य सरकारकडून हेल्पलाईन जारी

शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल 1 हजार 200 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याकडून (Disaster Management Department) देण्यात आली आहे. यातील 300 विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांशी संपर्क झाल्याचंही सरकारने सांगितलं. तसंच यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून हेल्पलाईनही जारी करण्यात आलीय.

Russia Ukraine War : महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले, 300 विद्यार्थ्यांशी संपर्क; राज्य सरकारकडून हेल्पलाईन जारी
विजय वडेट्टीवार, यूक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 10:10 PM

मुंबई : रशिया आणि यूक्रेनमध्ये भीषण युद्धाला (Russia Ukraine War) सुरुवात झालीय. रशियन सैन्यानं यूक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहराला वेढा घातलाय. अशावेळी यूक्रेनकडून एक पाऊल मागे घेत रशियाला चर्चेसाठी आवाहन केलं आहे. तर पूर्ण शरणागतीशिवाय चर्चा नाही, अशी भूमिका रशियाकडून घेण्यात आली आहे. अशावेळी शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील (Maharashtra) तब्बल 1 हजार 200 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याकडून (Disaster Management Department) देण्यात आली आहे. यातील 300 विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांशी संपर्क झाल्याचंही सरकारने सांगितलं. तसंच यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून हेल्पलाईनही जारी करण्यात आलीय.

राज्यातील अंदाजे 1 हजार 200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत, त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात ‘राज्य नियंत्रण कक्ष’ असून विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. तसंच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राज्याचा नियंत्रण कक्ष 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर द्यावी. तसेच जिल्हास्तरावर देखील हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेले आहेत, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाची सूचना

महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्यासाठी, तसेच त्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने योग्य पद्धतीने समन्वय साधावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या मुख्य सचिवांबरोबर संपर्क साधण्यासाठी त्यांनी सूचना केल्या आहेत. विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांची काळजी घेण्यासाठी व त्यांची तेथील नेमकी त्यांची काय परिस्थिती आहे याबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला सांगितले. कारण सध्या युक्रेनमधील परिस्थिती भयंकर आहे. त्यामुळे आपल्या देशातील नागरिकांची काळजी करण्यासारखीच परिस्थिती असल्याने उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाशी संपर्क साधून मुख्य सचिवांबरोबर याबाबत चर्चा केली.

महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्य सचिवांनी केंद्र शासनाशी समन्वय साधून नागरिकांबरोबर सातत्याने संपर्कात राहावे असेही सांगण्यात आले आहे. सध्या युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती असल्याने महाराष्ट्रातील नागरिकांची काळजी घेण्याच गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत केंद्राने परराष्ट्र खात्याबरोबर संपर्क साधून नागरिकांना देशात घेऊन येण्यासाठी समन्वय साधावा असेही त्यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या : 

Russia Ukraine Crisis : यूक्रेनमध्ये सत्तापालट? सत्ता तुमच्या हातात घ्या, ब्लादिमीर पुतिन यांचं यूक्रेनच्या सैन्याला आवाहन

Russia Ukraine War : शरणागतीशिवाय चर्चा नाही, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनचा प्रस्ताव फेटाळला!

Russia Ukraine Crisis : युद्धाच्या हाहाकारात यूक्रेनंचं एक पाऊल मागे, रशियासोबत चर्चेसाठी तयार, मात्र ठेवली ‘ही’ अट

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.