Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते’ शिवसेनेचा घणाघात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि गोपिचंद पडळकर अशा भाजप नेत्यांनावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जहरी टीका करण्यात आली आहे.

'...तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते' शिवसेनेचा घणाघात
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 6:57 AM

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून आणि राज्यात आणीबाणी लागू करा अशा विरोधकांच्या मागणीवरुन शिवसेनेने भाजपवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि गोपिचंद पडळकर अशा भाजप नेत्यांनावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जहरी टीका करण्यात आली आहे. यावेळी लिहिताना गोपिचंड फडळकरांना फेकूचंद असं म्हणत शिवसेनेनं भाजवर आरोप आणि टीकास्त्र डागले आहे. (saamana editorial shivsena criticized on devendra fadnavis and maharashtra opposition party bjp)

गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून आता शिवसेनेनं भाजपला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकुमशाही प्रवृत्तीची भीती वीटत नाही. अठरा दिवसांपासुन पंजब-हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधुर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा? महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला.’ अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

‘बऱ्याच दिवसांनी फडणवीसांचा सूर लागला पण….’

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणीबाणी लागू करा अशी मागणी विरोधी पक्षनेते करत आहेत. यावरही शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ‘बऱ्याच दिवसांनंतर फडणवीसांचा सूर लागला पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी आळवला आहे. आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरणे समोर आणली नाहीत. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगातच टाकले जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ‘थाप’ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. तो फसला. महाराष्ट्राइतके मोकळे वातावरण जगात कुठेच नसेल. स्वतः श्री. फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांच्यासारखे प्रमुख पुढारी रोज सरकारच्या विरोधात ‘डीजे’ लावल्याप्रमाणे ठणाणा करीत आहेत.’ असं म्हणत शिवसेनेकडून फडणवीसांसह इतर नेत्यांवरही टीका करण्यात आली आहे.

‘फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं’

इतकंच नाही तर यावेळी पडळकरांनाही शिवसेनेनं निशाणा केलं आहे. ‘विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच.’ (saamana editorial shivsena criticized on devendra fadnavis and maharashtra opposition party bjp)

‘…तर भाजपची खणा-नारळाने ओटी भरावी!’

कोणत्याही मुद्द्यावर भाजप आणीबाणीची भाषा करतं. पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर बोट करणारे आणि आपल्या राज्याविषयी चुकीचं बोलणारे भाजपला चालणार असतील तर त्यांची खणा-नारळाने ओटी भरावी अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी लिहलं की, ‘महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर दारूच्या गुळण्या टाकत असेल तर त्या उपटसुंभांना सोडताही कामा नये. एक वृत्तवाहिनीचा मालक मराठी उद्योजकास आत्महत्या करण्यास भाग पाडतो, हा साधा गुन्हा आहे काय? बाकी त्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी, घाणेरड्या भाषेत उल्लेख केला ते तूर्त बाजूला ठेवा. त्याबद्दल भाजपने त्याचे शाल व श्रीफळ देऊन कौतुक करावे, पण मराठी उद्योजकाने या माणसाच्या दहशतीखाली आत्महत्या केली, त्याचाही कायद्याने तपास करायचा नाही काय? मुंबईला पाकिस्तान, पोलिसांना माफिया वगैरे बोलणे हे विरोधी पक्षाला मान्य आहे काय? तसे असेल तर या नटीबाईची भाजप कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी! एकदा तुमचे संस्कार व संस्कृती चव्हाटय़ावर येऊ द्या.’ (saamana editorial shivsena criticized on devendra fadnavis and maharashtra opposition party bjp)

इतर बातम्या – 

काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचे, त्यामागे अहमदभाई आहेत : उद्धव ठाकरे

मराठा आंदोलक आक्रमक, सीएसटी परिसरात ठिय्या, पोलिसांसोबत झटापट; कोण काय म्हणालं वाचा!

(saamana editorial shivsena criticized on devendra fadnavis and maharashtra opposition party bjp)

'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.