Sadabhau Khot : “अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशातला नाच्या”, सदाभाऊ खोतांची मिटकरींवर जहरी टीका
रयत क्रांती संघटनेचे नेते आणि भाजपचे सहयोगी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरींवर (Amol Mitkari) जहरी टीका केली आहे. "अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. त्यांचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही." असे विधान सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
सांगली : राज्यात सध्या नवनीत राणा (Navneet Rana) यांची अटक, त्यांना जेलमध्ये मिळालेल्या वागणुकीबाबत कथित आरोप, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला ही प्रकरण गाजत आहेत. यावरून सध्या आरोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता दुसरा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण रयत क्रांती संघटनेचे नेते आणि भाजपचे सहयोगी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरींवर (Amol Mitkari) जहरी टीका केली आहे. “अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. त्यांचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही.” असे विधान सदाभाऊ खोत यांनी केले आहे. राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी हे भाजप आणि इतर विरोधकांवर तुटून पडत असतात. विरोधकांना ते वेळोवेळी सडेतोड उत्तर देत असतात. मिटकरींची भाषण ऐकलायलाही मोठी गर्दी जमते. पण विरोधकांवर केलेलेल्या सततच्या टीकेने आणि आपल्या जहरी विधानेने ते नेहमी चर्चेत असतात. त्यावरूनच आता सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत.
जातीयवादी नेते राष्ट्रवादीकडून तयार
राष्ट्रवादीवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणले, काही काळ यांचं नाचगाणं चालेल, फड मालकाला चांगलं वाटत असेल, पण तोडा-फोडा अशी नीती राष्ट्रवादीची आहे. अनेक नेते प्रत्येक समाजाचे घ्यायचे आणि जातीयवाद करायचा. तर दुसरीकडे शरद पवार साहेब आपले तारणहार आहेत. हे समाजाला समजावण्याचं काम राष्ट्रवादीमधील नेते करतात. महाविकास आघाडी हे विकास कामावर बोलायला तयार नाही, असे म्हणत जातीयवादावरून पुन्हा राष्ट्रवादीवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच जागर शेतकऱ्याचा, आक्रोश बहुजनांचा हे राज्यव्यापी अभियान 29 एप्रिल पासून कोकणातून सुरू करत आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका
काल मुख्यमंत्री एका शिवसैनिक आजीला भेटले त्यावरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे, एक आजी बाई आली आणि डायलॉग बाजी केली आणि मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. या महाराष्ट्रमध्ये अनेक आज्जी बाई आहेत. त्याचे डोळे पुसायला वेळ मिळाला का? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.तसेच आघाडी सरकार म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे. हनुमान चाळीसवर राणा यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. मग पवार साहेबाच्या घरावर जे गेले त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले. ते सर्व सामान्य लोक होते. त्यामुळे हे राज्य गुंडाराज्य झाले आहे, असेही खोत म्हणाले आहेत.