Shivsena : अजित पवार ‘या’ लोकांना झुकतं माप देतात; शिवसेना आमदाराचं वक्तव्य काय?
Sanjay Shirsat on Ajit Pawar NCP : ...म्हणून शरद पवार यांच्या राजकारणावर कुणातचा विश्वास नाही!; शिवसेना आमदाराने त्या भेटीगाठींचा दाखला दिला. अजित पवार यांच्या कामाचं कौतुक केलं. त्यांचे प्लस पॉइंट सांगितले. याचवेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबतही महत्वाचं विधान केलं आहे. पाहा...
छत्रपती संभाजीनगर | 24 सप्टेंबर 2023 : अजित पवार यांना झुकतं माप मिळालं आहे. तर तेही इतरांना झुकतं माप देतात. ही त्यांची प्लस बाजू आहे आणि त्यांच्या नेतृत्वाचे हे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत. म्हणून अजित पवार काम करताना सडेतोड आणि बिनधास्त काम करतात, असं म्हणत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचं कौतुक केलंय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही संजय शिरसाट यांनी टीका केली. शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या सुनावणीवरही त्यांनी भाष्य केलंय.
राहुल गांधी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतात. परंतु शरद पवार हे कुणाबरोबर युती करतील, कधी कोणत्या पक्षात जातील. याबाबत कुणीही खात्री देऊ शकत नाही. आज ते इंडिया आघाडीत दिसतील तर उद्या दुसरीकडे दिसतील. तर परवा अकेला चलो रे ही भूमिका घेतील. म्हणून शरद पवार यांच्या राजकारणवर किंवा भूमिकेवर कुणी विश्वास ठेवत नाही. हे सत्य आहे. म्हणून त्यांनी अदानींची भेट घेतली. ते पंतप्रधान मोदींना भेटतात. म्हणून शरद पवार यांच्या राजकारणावर कुणाचा विश्वास नाही, असं संजय शिरसाट म्हणालेत.
आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होतेय. उद्याही यासंदर्भात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीच्या वेळेस ठाकरे गटाच्या नेत्यांनी द्यायचं होतं ते कदाचित दिलं असावं. परंतू आणखी आमच्याकडे पोहचले नसावेत. त्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी उद्या सुनावणी ठेवलेली आहे. या सुनावणीला दोन्ही पक्षाचे वकील आपली बाजू मांडतील. आम्ही आमदार त्या सुनावणीला उपस्थित राहणार आहोत. या सुनावणीमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा होईल. हे आता जरी सांगता येत नाही. मात्र आपत्रतेबद्दलच्या सुनावणीची ही पहिली स्टेज आहे. 50 ते 54 रिड्स हेअरिंग होणार आहे. याला बराच काळ लागणार आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांचे ऐकून घ्यावं लागणार आहे. हा प्रोसेसचा भाग आहे. विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश असल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं गेलं आहे, असंही शिरसाट म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विषय काय आहे. आधी समजून घेतला पाहिजे. तो तर असेही म्हणेल की पाऊस पडत नव्हता. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पाऊस पडायला लावला असेल नाही. तर ईडीची धमकी दिली असेल. तुमच्या मातोश्री समोरची झाडे तोडून तुम्ही त्याठिकाणी वॉकिंग ट्रॅक करत असाल. त्यावेळी तुम्हाला पर्यावरण दिसत नाही. झाडाचे महत्व कळत नाही. परंतु एखाद्या वेळेस मेट्रोलाईन जात असेल. रस्ता बनत असेल तेव्हा तुम्हाला पर्यावरण दिसते. ही दुटप्पी भूमिका आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.