AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोटावर लावली शाई, मतदान कार्ड केले जमा, 1500 रुपयांवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा

Cash on Vote : मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यात अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्याचे समोर येत आहे. कुठे नेत्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी इतर घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजनगर शहरात तर मतदान न करण्यासाठी पैसे वाटप झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काय आहे हा प्रकार...

बोटावर लावली शाई, मतदान कार्ड केले जमा, 1500 रुपयांवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा
मतदानापूर्वीच राडा
| Updated on: Nov 19, 2024 | 12:00 PM
Share

प्रचाराचा तोफा थंडावल्या असल्या तरी मतदानापूर्वी खऱ्या प्रचाराला सुरूवात होते असे बोलले जाते. कयामत की रात असा उल्लेख मतदानापूर्वीच्या एक दोन रात्रींचा करण्यात येतो. राज्यात उद्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यात अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्याचे समोर आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नागपूरमध्ये तर नांदेडमध्ये एका उमेदवारावर दगडफेक करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी इतर घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजनगर शहरात तर मतदान न करण्यासाठी पैसे वाटप झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काय आहे हा प्रकार…

काय घडला प्रकार

छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मतदान कार्ड आणि आधार कार्ड जमा करून मतदान न करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. जवाहरनगर पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

1500 रुपये वाटप

मतदान न करण्यासाठी 1500 रुपये वाटप करण्यात येत आहे. त्यापोटी मतदारांकडून मतदान कार्ड, आधार कार्ड घेण्यात येत होते. त्यांच्या बोटावर शाई लावण्यात येत होती, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी केला आहे. त्यांनी तात्काळ जवाहर नगर पोलीस ठाणे गाठले. पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी केले. तर निवडणूक आयोगाने या प्रकारावर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली.

अंबादास दानवे यांची सोशल मीडियावर पोस्ट

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या सर्व प्रकारावर सोशल मीडिया, एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार, “छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी.” अशी मागणी केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.