AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेचा प्रस्ताव आला तर… ओवैसी यांचं सूचक विधान; महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार?

Asaduddin Owaisi on Manoj Jarange Patil : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. ओवैसी यांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण आलंय. वाचा सविस्तर...

मनोज जरांगेचा प्रस्ताव आला तर... ओवैसी यांचं सूचक विधान; महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार?
असदुद्दीन ओवैसी, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Jul 13, 2024 | 8:00 PM
Share

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली. मनोज जरांगे पाटील यांचा प्रस्ताव आला. तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करेल. बीडमधून जरांगे यांच्या मुळे पंकजा मुंडे पडल्या. त्यांना विजय मिळत आहे. मग मुस्लिम का जिंकत नाही.. महाराष्ट्र 11 टक्के मुस्लिमसाठी दुःख आहे. त्यांच्याकडून बोलणं होत असेल तर नक्की बोलू, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. ओवैसी -जरांगेंमध्ये सकारात्मक चर्चा झाली, मराठा समाज आणि मुस्लीम समाज एकत्र आला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगेंबाबत काय म्हणाले?

मी मनोज जरांगे पाटील यांची इज्जत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो… जरांगेंमुळे 8 खासदार निवडून आले… पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समाजाचे उमेदवार जिंकतात. पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाहीत. इम्तियाज जलील निवडून आले नसल्याने महाराष्ट्रमधील मुस्लिम समाजात राग आहे. आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचा दुःख आहे. मुस्लिम सर्वांना मतदान केलं. मग आम्हाला का मतदान करत नाही. यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे, असंही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

ओवैसींचा इशारा काय?

मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश आहे. मोदी म्हणतात मी बँकवर्डचा नेता आहे. मग आरक्षणाच्या टक्क्यांचं बिल आणा. महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार निवडून दिला नाही. आमचा एक उमेदवार होता त्याला देखील सर्वांनी मिळून हरवलं आहे. आम्ही सर्वांना मत दिली. पण आमचा उमेदवार पाडला. आम्हाला बहुमत मिळालं. पण प्रत्येक ठिकाणी गद्दार राहतात. त्यांना वाटत आपला माणूस जिंकला नको पाहिजे. गद्दार यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असा इशाराही ओवैसींनी दिला आहे.

बुलडोझर फक्त मुस्लिम लोकांच्या घरावर चालतात, निशाण्यावर फक्त आम्ही आहोत. आम्हीच फक्त भाजपचा विरोध करत आहे. त्यांना विचारा भीमा कोरेगावत जीव गेले. उद्या विरोध करण्याचा मुद्दा आल्यास भाजपला आम्ही विरोध करणार आहे. संपूर्ण लोकसभा निवडणुकीत एक मर्द जलील उभा होते. त्यांना पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. आम्ही जिंकण्यासाठी लढतो, कुणाला पाडण्यासाठी लढत नाही. इम्तियाज जलील यांची कमतरता लोकसभेत जाणवते. पण प्रश्न असा आहे की नुकसान कुणाचं होत आहे?, असं ओवैसी छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणाले.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.