ऐन निवडणूक काळात मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीला; कारण काय? शिंदे गटाच्या नेत्याने सविस्तर सांगितलं
CM Eknath Shinde at Guwahati : राज्यात विधानसभा निवडणूक होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले आहेत. ऐन निवडणूक काळात मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीला का गेलेत? यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर शिंदे गटातील मंत्र्याने प्रतिक्रिया दिलीय. वाचा सविस्तर...
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. असं असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आसामची राजधानी गुवाहाटीला गेले आहेत. 2022 ला राज्यात सत्तांतर होत असताना एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. आताही राज्यात निवडणूक होत असताना एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले आहेत. आम्ही केलेल्या उठावानंतर एक आशिर्वाद म्हणून दर्शन घेतलं आहे. हिंदु देव देवतांचं दर्शन घेणं योग्य आहे. आम्हाला साधू संतांच दर्शन घ्यायला आवडतं. कामाख्या देवींनी दिलेला आशिर्वाद लाभला. हे लोक आमचं पोस्टमार्टम करायला निघाले. देवींनी त्यांचंच पोस्टमार्टम केलं आहे, असं संजय शिरसाटांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले आहेत. मंत्री अशोक सिन्हा यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं आहे. एकनाथ शिंदे कामाख्या मंदिरात देवीची पूजा करणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.
निवडणुकीवर काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीवरही संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली. मी मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरलो तर विजयी होईल. माझ्या मतदारसंघात पैशे देऊन आयात उमेदवारी आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे आमच्या भगिनी एक गठ्ठा मतदान करणार आहेत, त्यामुळे मी विजयी होईल.माझ्या मतदारसंघातील मतदार सुजान आहेत. पैसा चालत नाही फक्त विकास अजेंडा आहे. लोक आम्हाला मतदान करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असं शिरसाट म्हणालेत.
कन्नडच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार 2 दिवसांत घोषित होतील. रावसाहेब दानवेंच्या कन्येबद्दल एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील.उमेश पाटलांनी कितीही टीका केली तरी शरद पवार गट त्यांचं स्वागत करणार आहे. उबाठा गटात आर्थिक इनकमिंग सुरू झालं आहे. सरकार कुठल्याही कामात थांबणार नाही, असंही शिरसाटांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी जे पुस्तक लिहिलं आहे. त्याला साक्षात्कार झाला आहे. नरकातूनही त्याला आम्ही स्वर्ग दाखवला आहे. इतक्या चांगल्या माणसाला स्वर्गाचा दार दाखवा… तो नरकात बेचैन आहे. त्यामुळे त्याला लवकरच स्वर्ग दिसला पाहिजे.संजय राऊताला वाटलं जेलमध्ये नरक असतो. पण त्याला तिथे स्वर्ग दिसला म्हणून विनंती आहे त्यांना स्वर्ग दाखवावं, असं म्हणत संजय शिरसाटांनी संजय राऊतांवर टीका केली आहे