राज ठाकरेंना कुणी सिरीयस घेत नाही; महायुतीच्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

Sanjay Shirsat on Raj Thackeray : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने राज ठाकरे यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. आज पुण्यात राज ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

राज ठाकरेंना कुणी सिरीयस घेत नाही; महायुतीच्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 7:18 PM

शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे खट्याळपणे बोलतात. त्यांचा हा स्वभाव आहे. त्यांना सिरीयस घेत नाहीत. त्यांनी मज्जा की मध्ये काढलेला हा विषय आहे, असं शिरसाट म्हणालेत. आज राज ठाकरे पुण्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुण्यात आलेल्या पुरावर भाष्य केलं आहे. राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्यातीलच आहेत. ते या ठिकाणी नसतानाही धरणात पूर आला.. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का? असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया

नुकत्याच झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सत्तेत बसण्याचा मानस बोलून दाखवला. 200 ते 225 जागा लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी या मेळाव्यात म्हटलं. त्यामुळे महायुतीतून बाहेर पडत राज ठाकरे एकला चलो रे ची भूमिका घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. त्यावर संजय शिरसाटांनी भाष्य केलंय. राज ठाकरेंची भूमिका काय असावी हा त्यांचा निर्णय त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी महायुती बरोबर राहावं हा आमचा आग्रह आहे. परंतु त्यांना स्वतंत्र लढायचं असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत.

राहुल गांधींवर निशाणा

जातगणना करण्याचं राहुल गांधींचं दरवेळेस मागणं आहे, त्यांचं तुणतुणं आहे. जातगणना करून उद्देश सफल होत असेल तर करायला हरकत नाही. जात गणना करून जातीमध्ये तेढ कसं निर्माण होईल हा काँग्रेसचा पहिल्यापासून चा प्रयत्न आहे. आम्ही जातगणना करू नये अशा विचाराचे नाहीत जरूर करावी. पण त्याचा उद्देश प्रामाणिक असावा. लोकसभेला संविधान बदलणार, मुसलमानाला पाकिस्तानला पाठवणार असा निरेटिव्ह सेट करून त्यांना थोडासा सपोर्ट मिळाला असं वाटतं पण आता लोकांच्या लक्षात आलं. पण हे खोटं बोलत होते, असंही शिरसाट म्हणालेत.

आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या भूमिकेला सर्वांनी पाठिंबा दिला आहे. जरांगे पाटलांना याची कल्पना आहे. ज्यांनी चाळीस वर्षात मराठा समाजाला काही दिले नाही. तो देण्याचा प्रमाणित प्रयत्न शिवरायाची शपथ घेऊन शिंदे साहेबांनी देण्याचा प्रयत्न केलाय. 46 लाख मराठा समाजाला आज कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले आहेत. दहा टक्के आरक्षण दिलेल आहे. जे करायचे ते चांगल्या पद्धतीने करायचं ही शिंदे साहेबांची भूमिका आहे, असं शिरसाट म्हणाले.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.