उद्धव ठाकरे समंजस नेते म्हणूनच…; शिंदे गटाच्या नेत्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा की टोला?

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray Birthday : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संजय शिरसाटांनी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरही शिरसाटांनी भाष्य केलंय. लाडकी बहिण योजनेबाबतही संजय शिरसाटांनी मत व्यक्त केलं आहे. वाचा सविस्तर......

उद्धव ठाकरे समंजस नेते म्हणूनच...; शिंदे गटाच्या नेत्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा की टोला?
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 5:34 PM

उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. स्वपक्ष, मित्र पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात. उद्धव ठाकरे हे समंजस नेते म्हणून ते पुढे आले. त्यांना राजकारणात यायचं नव्हतं. पण त्यांनी नको ते निर्णय घेतले. म्हणून पक्षाची वाट लागली. त्यांनी स्वतः च्या मनाने आणि स्वतःच्या इच्छेने घ्यावे त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा…, असं संजय शिरसाट म्हणालेत.

मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे ही भूमिका बाळासाहेबांनी मांडली. जेव्हा तसा प्रसंग आला तेव्हा साहेबांनी त्यांना मदत केली. मात्र हे तेव्हा मागे सरकले, यांनी तेव्हा माघार घेऊन संधी घालवली आज ते लिहीत असेल तर दुर्दैव आहे. आज मराठी पंतप्रधान नाही याला मोठे नेते जबाबदार आहेत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

लाडकी बहिण योजना फायदेशीर- शिरसाट

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा झाली आहे. यावर शिरसाटांनी भाष्य केलं. लाडकी बहिण योजना सुरू झाली आहे आणि प्रत्येक महिला सरकार मदत करेल या आशेने अर्ज करत आहे. त्यांना भरोसा आहे की सरकार माझ्या पाठीशी आहे. मात्र या योजनेवर काही लोकांना पोटशूळ उठला आहे. लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आहे. ती घोषणा सर्वांना फायदा होईल अशीच आहे. अनेकांनी स्वतःसाठी कर्ज काढले पण आम्ही जनतेसाठी काम करत आहे, असं शिरसाट म्हणाले.

आरक्षणावर काय म्हणाले?

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. यावर संजय शिरसाटांनी भाष्य केलंय. हे सरकार आरक्षणासाठी किती सजग आहे, हे सर्वांना कळलं आहे. आरक्षण देणं हे आमचं काम आहे. मनोज जरांगे पाटलांनी सर्वांना ठणाकाहून सांगितले आहे, की भूमिका स्पष्ट करा. यांची भूमिका काय हे समोर येईल तेव्हा आम्ही करत असलेले काम दिसेल. सरकार कोणत्याही एका गटाचं नाही. कुठल्याही एका जातीचा नाही सरकार सर्वांचं आहे. सर्वांचे विचार ऐकून घेत हे सरकारचे काम करत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला आरक्षण द्यायचे आहे.. या सरकारने नोंदी काढल्या. सर्व्हे केले. याअगोदर कुणीही हे केलं नव्हतं. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार ही आमची भूमिका आहे…..विरोधी पक्षाने जर भूमिका जाहीर केली तर त्यातून मार्ग काढू, असं शिरसाट म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.