प्रकाश आंबेडकर यांचं धक्कातंत्र, महाविकास आघाडीसाठी चिंता वाढणारी बातमी

महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याबाबत महत्त्वाची चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

प्रकाश आंबेडकर यांचं धक्कातंत्र, महाविकास आघाडीसाठी चिंता वाढणारी बातमी
prakash ambedkar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 4:09 PM

छत्रपती संभाजीनगर | 26 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवत आहेत. लोकसभेच्या जागावाटपासाठी सत्ताधारी दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाल्याची माहिती ताजी असताना आता विरोधी पक्षांमध्येही तशा अनेक घडामोडी घडत असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या तीनही पक्षांमध्ये खलबतं सुरु आहेत. असं असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या धक्कातंत्राचं अस्त्र उगारण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

वंचित बहुजन आघाडी पक्षाला महाविकास आघाडीत सहभागी करुन घ्यावं, अशी शिवसेना ठाकरे गटाची भूमिका आहे. पण महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांकडून हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता थेट लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत. त्याचसाठी वंचित बहुजन आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बैठकीत नेमकी चर्चा काय होणार?

वंचित बहुजन आघाडीची आज राज्य कार्यकारीणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत 2019 निवडणुकीतील टक्केवारी आणि 2024 च्या निवडणुकीत कोणकोणते उमेदवार उभे करायचे, यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे.

इंडिया आघाडीत वंचितला अद्याप सामील करुन न घेतल्यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा खंत व्यक्त केलीय. लोकसभेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी आहे. भाजपला पराभूत करायचं असल्यास विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, अन्यथा फटका बसण्याची भीती आंबेडकरांनी याआधीच व्यक्त केलीय.

महाविकास आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडी पक्ष महत्त्वाचा का?

महाविकास आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गेमचेंजर ठरणार आहे. कारण वंचित बहुजन आघाडीला प्रत्येक मतदारसंघांमध्ये मिळणारी मते ही लाखोंच्या घरात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच अनेक मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे दोन किंवा तीन नंबरला होता. त्यामुळे विरोधी पक्षांसाठी वंचित बहुजन आघाडी पक्ष महत्त्वाचा आहे.

वंचित बहुजन आघाडी पक्ष सोबत आला तर महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे. असं असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष खुलेपणाने प्रकाश आंबेडकर यांचं मविआत स्वागत करताना दिसत नाहीयत. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेचे उमेदवार ठरवले तर हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का ठरु शकतो. तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षाने खरंच स्वतंत्र निवडणूक लढवली तर विरोधी पक्षांच्या मतांचं विभाजन होईल आणि त्याचा प्रत्यक्ष फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.