Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारीच! ‘दार उघड बये दार उघड’ 99 वर्षांच्या आजींसमोर आदेश भावोजी पैठणी घेऊन दारासमोर हजर

आदेश बांदेकर समजून टीव्हीसमोर गाणे ऐकवणाऱ्या सांगलीच्या आजीच्या भेटीला आदेश भाऊजी आले. पैठणी देऊन आजीबाईचा सन्मान करण्यात आला. यावेळी आईच्या आठवणीने आदेश बांदेकरांचे डोळे पाणावले.

भारीच! 'दार उघड बये दार उघड' 99 वर्षांच्या आजींसमोर आदेश भावोजी पैठणी घेऊन दारासमोर हजर
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 5:19 PM

सांगली : झी मराठीवरच्या होम मिनिस्टर (Home Minister) कार्यक्रमात सहभागी होण्याची अनेकांची इच्छा असते. काहींची ती इच्छा काहीवेळेला पूर्ण होते. तर काहीजणी त्याची वाट पाहत राहतात. एका आजीबाईंची ही इच्छा वयाच्या 99 वर्षी पूर्ण झाली. टिव्हीसमोर होममिनिस्टर लागल्यावर आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांना पाहून आदेश समोर असल्याचा भास करीत गाणे म्हणणाऱ्या नलिनी जोशी (Nalini Joshi) या 99 वर्षीय आजीची आज आदेश बांदेकर यांनी सांगलीत भेट घेतली. निमित्त होते आजीच्या 100 तील पदार्पण कार्यक्रमाचे. यावेळी समक्ष आदेश बांदेकर यांना पाहून आजीही आवक झाल्या. यावेळी आदेश बांदेकर यांनी आजीला पैठणी सुद्धा भेट देत तिचा सन्मान केला.

दररोज होमनिस्टर कार्यक्रम लागला की साडेपाच वाजता सांगलीतील नलिनी माधव जोशी या 99 वर्षीय आजी टीव्हीसमोर बसून स्क्रीनवर दिसणाऱ्या आदेश बांदेकर यांना गाणे ऐकवयाच्या..आदेश बांदेकर हे आपल्या समोरच आहेत असे समजून जोशी आजी दररोज गाणे म्हणायच्या. सांगलीतील या अजीबाईचे अनोखे प्रेम ऐकून आदेश बांदेकर यांनी थेट सांगली गाठत या आजीबाईंची भेट घेतली. साक्षात आदेश बांदेकर यांना पाहून आजींना आश्चर्य वाटलंच शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळच हास्य आणि समाधान निर्माण झाले. यावेळी आदेश बांदेकर यांच्या गळ्यात पडून आजीबाईंची आपला आनंद व्यक्त केला.

सांगलीतील नलिनी जोशी यांनी 99 वर्षे पूर्ण करीत 100 व्या वर्षात पदार्पण केले. या कार्यक्रमास आदेश बांदेकर यांनी उपस्थिती लावत आजी नलिनी जोशी यांना पैठणी भेट देत मनसोक्त गप्पाही मारल्या. यावेळी बोलताना आदेश बांदेकर यांना त्यांच्या आईची आठवण आली आणि या आठवणीने बांदेकर यांचे डोळे पणावल्याने संपूर्ण वातावरण गहिवरून गेले.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.