Sangli Corona : सांगलीने करुन दाखवलं, एकाच कुटुंबातील 25 रुग्ण कोरोनामुक्त
इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील कोरोनाबाधित 25 रुग्ण हे आता कोरोनामुक्त झाले आहेत. या 25 रुग्णांपैकी 22 रुग्णांचे अहवाल आधीच निगेटिव्ह आले होते.
सांगली : राज्यात कोरोनाने हाहा:कार माजवला (Sangli Corona Patients Report) आहे. मात्र, यादरम्यान सांगलीकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील कोरोनाबाधित 25 रुग्ण हे आता कोरोनामुक्त झाले आहेत. या 25 रुग्णांपैकी 22 रुग्णांचे अहवाल आधीच निगेटिव्ह आले होते. त्यानंतर उर्वरित तीन जणांचे अहवाल आज आले आणि हे तिघेही कोरोना (Sangli Corona Patients Report) निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. आता त्यांच्या संपर्कातील एक महिलाच कोरोनाबाधित आहे.
सांगलीत 26 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचं समोर आलं होतं. मात्र, त्यापैकी 22 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची बातमी गुरुवारी आली. या 22 रुग्णांच्या दोन्ही टेस्टचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला होता. त्यानंतर आज इतर तिघांचे रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Corona : धक्कादायक! पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिकhttps://t.co/cUdwlg9JvF#PuneFightsCovid19 #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 11, 2020
दरम्यान, 26 पैकी 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 वर आली आहे. या 25 जणांच्या संपर्कातील 1 महिला सध्या पॉझिटिव्ह आहे. या महिलेच्या संपर्कात असल्याने त्या 25 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते बरे झाले आहेत. तरी नियमाप्रमाणे त्यांना काही दिवस होम क्वारंटाईनमध्ये (Sangli Corona Patients Report) राहावं लागेल.
एकीकडे देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना सांगलीतील ही बातमी एक आशेचा किरण आहे.
राज्यात कोरोनाचा धोका वाढताच
सध्या राज्यात 1,574 कोरोनाबाधित आहेत. तर काल एका दिवसात 210 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत राज्यात 110 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, 188 रुग्ण हे बरे होऊन घरी देखील गेले आहेत.
Sangli Corona Patients Report
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
पुण्यात डिस्चार्ज दिलेल्या दाम्पत्याला कोरोना, तर पोलिसाची आईही पॉझिटिव्ह
Corona : जगाची खबरबात! जगात ‘कोरोना’मुळे एक लाख बळी, 101 व्या दिवशी ओलांडला टप्पा
सर्दी, खोकल्याच्या त्रासामुळे विलगीकरण कक्षात उपचार, बुलडाण्यात कोरोना संशयित महिलेचा मृत्यू
Corona : धक्कादायक! पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशाच्या दुप्पट