आधी पत्नी पडली, पती वाचवायला गेला अन्; असं काही घडलं की सांगली हादरली

भाटशिरगाव पाझर तलावात बुडून पती-पत्नीचा (Husband and wife) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आधी पत्नी पडली, पती वाचवायला गेला अन्; असं काही घडलं की सांगली हादरली
दोघांचेही मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले.
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 9:41 PM

सांगली :  भाटशिरगाव पाझर तलावात बुडून पती-पत्नीचा (Husband and wife) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अर्जुन देसाई, सुमन देसाई असे पती-पत्नीचे नाव आहे. तलावात पडलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी गेला असताना पतीही पाण्यात पडला, परिणामी या दोघांची मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बुधवारी घडली. या प्रकारामुळे भाटशिरगाव गावावर शोककळा पसरली आहे. ( Sangli death of Husband and wife due to fall in lake, Husband tried to rescue her)

पत्नीला वाचवायला गेला अन्….

मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात भाटशिरगाव येथे अजुन देसाई आणि सुमन देसाई हे दाम्पत्य राहत होते. गावातील पाझर तलावाजवळ असलेल्या शेताजवळ एक वस्ती आहे. या वस्तीमध्ये हे दाम्पत्य वास्तव्यास होते. यावेळी जवळच्या पाझर तलावात आपली पत्नी बुडत असल्याचे पती अर्जुन देसाई यांच्या निदर्शनास आले. ही गोष्ट लक्षात येताच त्यानी तलावात उडी टाकून आपली पत्नी सुमन देसाई यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये अर्जुन देसाई तसेच सुमन देसाई या दोघांचाही मृत्यू झाला असावा असे सांगण्यात येत आहे.

दोघेही तलावात बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर देसाई दाम्पत्यांचा नातू साकेत याला ही घटना समजली. त्याने ही घटना बाजूच्या लोकांना सांगितली. मात्र, त्या दोघांनाही वाचवण्यात लोकांना यश आले नाही.

दरम्यान, हा प्रकार समजताच पोलीस निरीक्षक विशाल पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मृतदेहाचा शोध लागल्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर या दाम्पत्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे भाटशिरगाव गावातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

‘कार्यकर्ते गादीवर, आमदार जमिनीवर’, साधेपणानं राहणारा अहमदनगरचा आमदार कोण?https://t.co/PWBegvuDGZ#Ahmednagar #MLA #Maharashtra

इतर बातम्या :

15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर, पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम

महिनाभरापूर्वी लग्न, विवाहबाह्य संबंधांचा संशय, दोन नववधूंची पतीकडून हत्या

( Sangli death of Husband and wife due to fall in lake, Husband tried to rescue her)

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.