“लोकांना आवडते म्हणून बोलण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अडचणींवर बोला”; ठाकरे-फडणवीस वादावर या नेत्याची सडकून टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकमेकांवरील व्यक्तीगत टीका केल्यानंतर संभाजीराजे यांनी त्यांना सुनावले आहे.

लोकांना आवडते म्हणून बोलण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अडचणींवर बोला; ठाकरे-फडणवीस वादावर या नेत्याची सडकून टीका
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 9:59 PM

सांगली : देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर आता भाजपप्रमाणेच विरोधकही आता आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याव फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. त्यावरून आता राजकारण तापलेले असतानाच माजी खासदार संभाजीराजे यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवरून माजी खासदार संभाजीराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले आहे. एकमेकांवर टीका करण्यापेक्षा राज्याच्या विकासावर चर्चा करणे, त्यासाठी विकासात्मक राजकारण करणे गरजेचे असल्याचे मत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

संभाजीराजे यांनी बोलताना सांगितलेकी, राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे व्यक्ती दोष ठेऊन राज्याचे राजकारण ज्या प्रमाणे सत्ताधाऱ्यांनी करू नये त्याच प्रमाणे विरोधकांनीही करू नये असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संभाजीराजे यांनी राजकारण्यांना सुनावत असताना त्यांनी व्यक्ती दोष ठेवून राजकारण केले जाऊ नये अशी सत्ताधारी आणि विरोधकांनी विनंती केली आहे.छोट्या छोट्या गोष्टीवरून राजकारण करून राज्याचा विकासाला खीळ बसता कामा नये अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विकासात कोणी चुकत असेल तर नक्की बोलावे, मात्र व्यक्ती दोष ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सध्या राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणामुळे विकासाच्या राजकारणावर त्याचा परिणाम होऊन राज्याचा विकासाला हे बाधक असल्याचेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर विकासावर राजकारण्यांनी आता विकासावरच बोललं पाहिजे. कारण आपल्याला राज्याचा विकास साधायचा आहे.

सत्तेत असणाऱ्या आणि नसणाऱ्यांनीही व्यक्ती सोडून बोलणं गरजेचं आहे. लोकांना आवडते म्हणून बोलण्यापेक्षा, महाराष्ट्र किती अडचणीतून चालला आहे. त्याला नवी दिशा कशी देता येईल यावर बोलणे झाले पाहिजे आणि त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकमेकांवरील व्यक्तीगत टीका केल्यानंतर संभाजीराजे यांनी त्यांना सुनावले आहे. आज सांगलीमध्ये मराठा प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्याच्या कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.