Alto आणि Swift कारचा भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघे ठार, पुतणी थोडक्यात बचावली!

Sangli Accident : धक्कादायक बाब म्हणजे या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

Alto आणि Swift कारचा भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघे ठार, पुतणी थोडक्यात बचावली!
मालेगावातील सटाणा रोडचा डेंजर झोन, एकाच ठिकाणी तीन दिवसात तीन अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 8:08 PM

सांगली : सांगलीतील (Sangli Accident) आष्टानजीक भीषण अपघात झाला आहे. आष्टाजवळील गाताडवाडी इथं स्विफ्ट आणि अल्टो कारचा (Alto and Swift Car accident) भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झालाय. तर तिघे जण जखमी झालेत. चारपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एका जखमीला सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातात दोघांचा जागीच जीव गेला. तर अपघातानंतर दोघांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान, त्यांचाही मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. एका घरगुती कार्यक्रमाला जात असतेवेळी या कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. अचानक समोरच्या कारनं ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या ट्रक चालकाला गाडी कंट्रोल करता आली नाही. आणि त्यानं मागून कारला धडक दिली. या भीषण अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी (Sangli Police) तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला

मलकापूरचं एक कुटुंब घरगुती कार्यक्रमासाठी जायला निघाल होतं. मलकापूरहून हे कुटुंब सांगलवाडी इथं जाणार होतं. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. मलकापूरचे अधिकराव पोळ, त्यांची आई गीताबाई, पत्नी सुष्मा, भावजय सरीता आणि त्यांची पुतणी असे सगळे एकत्र प्रवास करत होते.

पाच जण मिळून गाडीतून निघाले असता अचानक वाटेत समोरील कारनं ब्रेक लावला. त्यामुळे कार चालवणाऱ्या पोळ यांनाही तातडीनं ब्रेक लावावा लागला. या दरम्यान, मागून येणाऱ्या डम्परच्या चालकाला मात्र अचानक लावलेल्या ब्रेकमुळे गाडी कंट्रोल करता आली नाही. डम्परनं जोरदार धडक पोळ यांच्या गाडीला दिली. यात पोळ आणि कुटुंबीयांची गाडी मधल्या मध्ये भरडली गेली. या अपघातात दोघांची जागीच जीव गेला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले होते.

दोघांचा जागीच, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू

या अपघातानंतर नागरिकांनी तातडीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले आणि तिघा गंभीर जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

तिघा जखमींपैकी दोघांनी रुग्णालयात जीव सोडलाय. दरम्यान, या भीषण अपघातातून पोळ यांची पुतळी बालंबाल बचवली आहे. मात्र संपूर्ण पोळ कुटुंबावर या अपघाताच्या घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळलाय.

अपघातातील मृतांची नावं पुढील प्रमाणे :

  1. अधिकराव पोळ, वय 49
  2. गीताबाई पोळ, वय 70
  3. सरिता सुभाष पोळ, 35
  4. सुषमा पोळ, 42

संबंधित बातम्या :

सांगलीत काळीज चर्रर्र करणारा अपघात, 7 कि.मी. पर्यंत चिमुकल्याला फरफटत नेलं, पब्लिक संतप्त

टायर फुटल्याने सांगलीत कारने दिंडीला चिरडलं, तिघा भाविकांचा करुण अंत

हेल्मेटने बाईकचा स्पीड कमी-जास्त, चोरीलाही आळा, सांगलीच्या पठ्ठ्याचा अवाक करणारा शोध

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.