एसटी कर्मचाऱ्यांचा नवा जुगाड, महिला कंडक्टरने दोरीच्या साहाय्याने अॅक्सिलेटर कमी जास्त केला

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आगारातील एसटी चालकावर एसटी खराब झाल्याने आपल्या हाती बसचं स्टेअरिंग ठेवलं, तर अॅक्सिलेटरला दोरी बांधून ते महिला कंडक्टरच्या हातात देण्याची वेळ आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा नवा जुगाड, महिला कंडक्टरने दोरीच्या साहाय्याने अॅक्सिलेटर कमी जास्त केला
sangli st newsImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 11:18 AM

सांगली : एसटी (ST Bus) खराब झाल्यानंतर बस चालकाने केलेला जुगाड सगळीकडे व्हायरल झाला आहे. एसटीच्या चालकाने महिला कंडक्टरच्या साहाय्याने आगारात कशी बस आणली या व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Transport Corporation) काही गाड्या अजून खराब स्थितीत आहेत, त्याचबरोबर राज्य शासनाकडून त्याचं गाड्या चालवल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. बसचं अॅक्सिलेटर खराब झाल्यानंतर चालकाने महिला कंडक्टरच्या (sangli st news) हातात अॅक्सिलेटर बांधून दोरी दिली. महिला कंडक्टर ती दोरी कमी जास्त करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही बस आगारापर्यंत दोघांनी कशीबशी नेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उजेडात आला आहे.

एसटीचा अॅक्सिलेटर खराब झाला

बस चालकाने हाती स्टेअरिंग ठेवत अॅक्सिलेटरला दोरी बांधली, ती दोरी महिला कंडक्टरकडच्या हातात दिली. कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या मार्गवर हा बसमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महामंडळाच्या नादुरुस्त एसटी बसेसचा मुद्या पुन्हा चव्हाट्यावर यामुळे आला आहे. सोशल मीडियावर या बसमधील अनेक व्हिडीओ फिरत आहेत.

हे सुद्धा वाचा

चालकाच्या जुगाडचे सर्वत्र कौतुक

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आगारातील एसटी चालकावर एसटी खराब झाल्याने आपल्या हाती बसचं स्टेअरिंग ठेवलं, तर अॅक्सिलेटरला दोरी बांधून ते महिला कंडक्टरच्या हातात देण्याची वेळ आली आहे. कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या मार्गावर बस धावत असताना हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे एसटीचा आणि नादुरुस्त एसटी बसेचचा मुद्या पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अॅक्सिलेटर खराब झालेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून नाईलासत्व वाहकाने हा जुगाड केल्याचे समोर येत आहे. नादुरुस्त अॅक्सिलेटर दोरीने बांधून चालकाने शेवटी ती दोरी महिला कंडक्टरच्या हाती दिली. महिला कंडक्टरला चालकाने ती अॅक्सिलेटरची दोरी योग्यवेळी कमी-जास्त ओढण्यास सांगितली. अशा पध्दतीने जुगाड करत जवळपास ४० किलोमीटर अंतर पार करण्यात आले. समजा अशावेळी एखादी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.