Sanjay Kute : महिला बचत गटातही कोट्यवधींचा घोटाळा? भाजप आमदार संजय कुटेंचे गंभीर आरोप
संजय कुटे यांनी आरोप करताना, राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांचं नेटवर्क या लुटीसाठी वापरल गेलंय. 11 हजारांची एक मशीन विकण्यात आली. ज्याची मार्केट व्हॅल्यू ही केवळ 1100 रूपये आहे. 600 ते 700 रूपये रूपयांच्या मशीनची विक्री 8-10 हजारात विकल्याचाही आरोप करण्यात आलाय.
मुंबई : राज्यात अनेक विभागात घोटाळे झाल्याचे आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याच्यासह इतर भाजप नेते करत आहेत. अशातच आता भाजप आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांनी पुन्हा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. महिला बचत गटांमध्येही (Womens self help groups) भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कुटे यांच्याकडून करण्यात आलाय. महाविकास आघाडी अडीच वर्षात परंपरा आता परत सुरूच आहे. घोटाळे, फसवणूक, भ्रष्टाचार वाढतच आहे. ज्यात राज्यातलं एकही क्षेत्र लुट आणि फसवणूकीपासून बाहेर राहिलेल नाही, असा हल्लाबोल भाजप आमदार संजय कुटे यांनी केला आहे. आता मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची लुट सुरू आहे. महिलांना स्वयंरोजगार द्यायला हवा, उभ करायला हवं ही अपेक्षा होती, मात्र 26 जिल्ह्यांमध्ये महिला बचत गटांची लूट होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांच्या नेटवर्कचा वापर?
संजय कुटे यांनी आरोप करताना, राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांचं नेटवर्क या लुटीसाठी वापरल गेलंय. 11 हजारांची एक मशीन विकण्यात आली. ज्याची मार्केट व्हॅल्यू ही केवळ 1100 रूपये आहे. 600 ते 700 रूपये रूपयांच्या मशीनची विक्री 8-10 हजारात विकल्याचाही आरोप करण्यात आलाय. कोट्यवधी रूपयांचा अपहार करून ही कंपनी आता फरार झालीय. एकाच मतदार संघात जवळपास 8 कोटी रूपयांचा अपहार झाला असल्याचा आकडाही कुटे यांनी सांगितला आहे. आता याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. पण लाखो महिलांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करून ही सर्व कंपनी फरार असल्याचे कुटे यांनी सांगितले आहे.
सुप्रिया सुळेंचं नाव वापरलं?
याच्या माध्यमातून राज्यातील कष्टकरी महिलांची मोठी लूट झालीय. त्यामुळे गृहमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी. यातील प्रमुख आरोपी हिवरे याचा शोध लागला पाहिजे. त्यासाठी गृहमंत्र्यांनी एक एसआयटी स्थापन करावी. राज्यभरात शेकडो तक्रारी झाल्या आहेत, त्याची एकत्रीत तपास करावा. गृहमंत्र्यांकडे याबद्दल सर्व माहिती द्यावी अशी मागणी कुटे यांनी केली आहे. यामध्ये जस दिसतंय तसं यामध्ये राष्ट्रवादी कनेक्शन असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सर्व महिलांना सुप्रिया सुळे आमच्या मार्गदर्शक आहेत असं सांगितल गेलं, त्यामुळे महिलांनी विश्वास ठेवला. मात्र आमचा असा आरोप नाहीये की यामध्ये त्यांचा सहभाग आहे. मात्र अशा पद्धतीने सत्ताधारी पक्षातील मोठ्या नेत्यांची नाव वापरली गेली असतील तर याबद्दल चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी कुटे यांनी केली आहे.