‘उद्धव ठाकरेंची बोंबाबोंब म्हणजे चोर की दाढी मे तिनका’, संजय निरुपम यांचा घणाघात

"उद्धव ठाकरे ब्लॅक मनीचा म्हणजेच काळ्या धनाचा वापर करत आहेत. यामुळे त्यांना भीती वाटत आहे, जर तपासणी झाली तर काळे धन सापडणार आणि त्यामध्ये कायदेशीररित्या अडकणार. उद्धव ठाकरेंची बोंबाबोंब म्हणजे चोर की दाढी मे तिनका", अशी खोचक टीका संजय निरुपम यांनी केली.

'उद्धव ठाकरेंची बोंबाबोंब म्हणजे चोर की दाढी मे तिनका', संजय निरुपम यांचा घणाघात
संजय निरुपम आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 5:06 PM

निवडणूक प्रचारादरम्यान दोनवेळा उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे. त्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते तथा दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय निरुपम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासण्यात आल्या. मात्र त्यांनी कधी याचं भांडवल केलं नाही. कारण त्यांच्याकडे अशी काहीही भीती नव्हती. त्यांनी कधीही ब्लॅक मनीचा वापर केला नाही. उद्धव ठाकरे ब्लॅक मनीचा म्हणजेच काळ्या धनाचा वापर करत आहेत. यामुळे त्यांना भीती वाटत आहे, जर तपासणी झाली तर काळे धन सापडणार आणि त्यामध्ये कायदेशीररित्या अडकणार. उद्धव ठाकरेंची बोंबाबोंब म्हणजे चोर की दाढी मे तिनका”, अशी खोचक टीका संजय निरुपम यांनी केली.

“उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ बनवून बोंबाबोंब केली. उद्धव ठाकरे एवढे कशाला बोंबाबोंब करत आहेत? कोणाचीही बॅग तपासणी झाली पाहिजे .कुणाच्याही चोपरची तपासणी झाली पाहिजे. कुणाच्याही गाडीची तपासणी झाली पाहिजे. जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया चालू असते, निवडणुकीत काळ्या धनाचा वापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोग तपासणी करत आहे”, असं संजय निरुपम म्हणाले.

‘त्यांनी कधी बोंबाबोंब केली नाही’

“पूर्वी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चोपरची तपासणी झाली होती. त्यांनी कधी बोंबाबोंब केली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौपरची तपासणी झाली. त्यांनी कधीही बोंबल केली नाही. कारण त्यांच्याकडे असं काहीही भीती वाटणारं नव्हतं. त्यांनी कधीही ब्लॅक मनीचा वापर केला नाही” असं संजय निरुपम म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘तपासणी झाली तर ब्लॅक मनी सापडणार आणि ठाकरे अडकणार’

“उद्धव ठाकरे ब्लॅक मनीचा वापर करत आहेत. त्यामुळे त्यांना भीती वाटत आहे. जर तपासणी झाली तर ब्लॅक मनी सापडणार आणि त्यामध्ये कायदेशीररित्या अडकणार”, असा आरोप संजय निरुपम यांनी केला. संजय निरुपम यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्यावरही टीका केली. “माझे बिल्डरशी संबंध असतील तर ते सिद्ध करून दाखवा. मी राजकारणाचा राजीनामा देईन, असे सुनील प्रभू म्हणाले होते. आज मी सिद्ध केले आहे. आता हिंमत असेल तर राजीनामा द्या”, असं संजय नरुपम म्हणाले आहेत.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.