एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून झालेले आरोप आणि 15 दिवसाच्या अज्ञातवासानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मौन सोडलं. (sanjay rathod addressing media at poharadevi)

एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 2:15 PM

वाशिम: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून झालेले आरोप आणि 15 दिवसाच्या अज्ञातवासानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मौन सोडलं. राठोड यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. पूजा चव्हाण प्रकरणात माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली जात आहे. पूजा चव्हाण पण आत्महत्या प्रकरणी घाणेरडं राजकारण सुरू आहे, असं सांगतानाच एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका, अशी कळकळीची विनंतीच संजय राठोड यांनी हातजोडून केली. (sanjay rathod addressing media at poharadevi)

पोहरादेवी गडावर हजारो लोक जमल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले होते. त्यामुळे संजय राठोड यांनी सभा न घेता पत्रकार परिषद घेतली. परंतु, पत्रकार परिषदेतही कार्यकर्ते घुसल्याने त्यांना संवाद साधणं कठिण गेलं. त्यामुळे या ठिकाणी काहीवेळ गोंधळ झाला. याप्रसंगी राठोड वारंवार आवाज येतोय का? सर्वांना आवाज येतोय? अशी विचारणा करत होते.

राठोड काय म्हणाले?

पूजा चव्हाण या गौर बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत मला दु:ख आहे. चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरून महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते चुकीचं आहे, मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारं हे राजकारण आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला.

मी ओबीसींचा नेता

मी मागासवर्गीय समाजातून आलो आहे. भटक्या विमुक्तांसाठी काम करत आहे. मी ओबीसींचा नेता आहे. पण गेल्या काही दिवसांपासून घाणेरडं राजकारण करून माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. विविध माध्यमांवर माझ्या बाबतीत जे काही दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. जे काही व्हायरल होत आहे. त्यात काही तथ्य नाही, असा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली, सत्य बाहेर येईल

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. पोलीसही तपास करत आहेत. तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल. पण समाजाची आणि माझी वैयक्तित बदनामी करू नका, असंही ते म्हणाले.

कुठेच गेलो नव्हतो, काम सुरू होतं

मी दहा दिवस कुठेही गेलो नव्हते. जे काही सुरू होतं. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला सावरत होतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. माझी वृद्ध आई आहे. या सर्वांना मी सावरत होतो. मुंबईच्या माझ्या कार्यालयातून माझं काम सुरू होतं. मी आज काही बोलणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. (sanjay rathod addressing media at poharadevi)

अनेकजण फोटो काढतात

याविषयी अरुण राठोडसोबत काढण्यात आलेल्या फोटोवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी चार वेळा निवडून आलो आहे. गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक कार्यात आहे. माझ्यावर समाजाचे प्रेम आहे. त्यामुळे अनेक लोक येतात आणि माझ्यासोबत फोटो काढतात. असं सांगत विश्वास ठेवा चौकशीतून सर्व काही बाहेर येईल, असंही त्यांनी सांगितलं.

पूर्वी सारखंच काम करेल

आज मी पवित्र ठिकाणी आलो आहे. त्यामुळे या गडावरून मी माझी भूमिका मांडली आहे. चौकशी सुरू असून मी पूर्वीसारखच काम करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (sanjay rathod addressing media at poharadevi)

संबंधित बातम्या:

प्रवास, गर्दी ते तोंडाला मास्क, पोहरादेवी गडावर संजय राठोडांच्या पत्नीला भोवळ!

संजय राठोड दोन तासात पोहरादेवीत; वाचा, सकाळपासून नेमकं काय काय घडलं!

Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण, संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

(sanjay rathod addressing media at poharadevi)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.