Sanjay Raut on Somaiya Toilet Scam : सोमय्यांच्या आधीच राऊतांचा हल्ला; 100 कोटींच्या टॉयलेट घोटाळ्याचा सोमय्यांवर थेट आरोप
Raut on Somaiya: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचा आणखी एक आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात त्यांच्या कुटुंबाचा सहभाग आहे.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर घोटाळ्याचा आणखी एक आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात त्यांच्या कुटुंबाचा सहभाग आहे. युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून खोटी बिलं दाखवून सोमय्या यांनी हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा मी लवकरच उघड करणार आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी मी काय करणार हे कळेल. आज तुम्ही त्या आरोपीला प्रश्न विचारा. इलू इलू क्या है असं आपण म्हणतो ना, तसं टॉयलेट घोटाळा (toilet scam) काय आहे, असं त्या आरोपीला विचारा, असं राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. त्यामुळे त्याला किरीट सोमय्या काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या महाशयाचा मी टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झाला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं. त्यांना भ्रष्टाचाराची फार कणव आहे. त्यांची. भाजपवाल्यांची राष्ट्रभक्ती फार उचंबळून येत असते. त्यामुळे आम्ही काढणार असणाऱ्या टॉयलेट घोटाळ्यावर त्यांनी बोलावं, असा टोला राऊत यांनी लगावला.
पुरावे कुठे आहेत हे सर्वांना माहीत आहे
100 कोटीच्यावर टॉयलेट घोटाळा झाला. घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
सोमय्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये
पाकमध्ये दाऊद बसला आणि तो महाराष्ट्रातील घोटाळे बाहेर काढू लागला तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? तो आरोपी आहे. दाऊद इब्राहीमने जसं दहशतवादावर बोलू नये तसं विक्रांत घोटाळा ज्यांनी केला आहे त्यांनी दुसऱ्यांवर खोटे आरोप करणं चुकीचं आहे. आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या. विक्रांतचा पैसा कुठे गेला. फडणवीसांनी पवारांवर ट्विटवर ट्विट केलं. एखादं ट्विट त्यांनी विक्रांतवर करावं. आम्ही टॉयलेट घोटाळा काढणार आहोत. त्यावर एखादं ट्विट करावं, असा चिमटा त्यांनी काढला.
संबधित बातम्या:
Raut on Somaiya: स्वतः शेण खाणारे दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात, राऊतांची सोमय्यांवर टीकेची झोड