Sanjay Raut | राऊतांच्या खात्यात प्रवीण राऊतांचे 1 कोटी कसे आले? चौकशीसाठी हवी कोठडी, कोर्टात ईडीच्या वकिलांची मागणी

संजय राऊत ईडीच्या कोठडीत असताना ईडीने मुंबई आणि परिसरात आणखी काही ठिकाणी छापेमारी केली. त्यावरून आम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र मिळाले असल्याचं ईडीतर्फे आज कोर्टात सांगण्यात आलं.

Sanjay Raut | राऊतांच्या खात्यात प्रवीण राऊतांचे 1 कोटी कसे आले? चौकशीसाठी हवी कोठडी, कोर्टात ईडीच्या वकिलांची मागणी
संजय राऊत, शिवसेना खासदारImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 1:58 PM

मुंबईः संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या खात्यावर प्रवीण राऊत (Pravin Raut) यांच्या खात्यातून 1 कोटी 6 लाख रुपये कसे आले, तसेच राऊतांच्या परदेश दौऱ्यासाठी वापरण्यात आलेल्या रकमेच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी संजय राऊत यांची ईडी कोठडी (ED Custody) वाढवून मिळावी, अशी मागणी ईडीतर्फे आज कोर्टात करण्यात आली. संजय राऊत यांना आज ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी ईडीने त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तपासात काही महत्त्वपूर्ण कागदपत्र मिळाले असून याचा तपास आणखी बाकी असल्याचं सांगितलं. या कागदपत्रांमध्ये त्यांच्या अलिबागमधील बंगल्याविषय़ी काही पुरावे हाती लागल्याचंही ईडीतर्फे सांगण्यात आलं आहे. अलिबागमधील जमीन खरेदी करताना प्रवीण राऊत यांच्याकडून मिळालेल्या पैशांचा वापर संजय राऊतांनी केला असल्याचा दावा ईडीतर्फे केला जातोय. प्रवीण राऊतांकडे ही रक्कम पत्राचाळ घोटाळ्यातून आल्याचाही संशय ईडीने वर्तवला आहे. या सर्व प्रकरणाची अधिक सविस्तर चौकशी करण्यासाठी राऊतांची कोठडी आणखी वाढवण्याची मागणी ईडीच्या वकीलांतर्फे करण्यात आली.

विशेष पीएमएलएम कोर्टात सुनावणी

गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊतांची आठ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टाने त्यांना चार दिवसांची कोठडी दिली होती. ती कोठडी आज संपली. त्यासाठी त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलओ कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायाधीश एम व्ही देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 1 कोटी 6 लाख रुपये प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून मिळाले होते. त्यातून त्यांनी अलिबागमधील तसेच इतर काही मालमत्ता खरेदी केल्याचा दावा ईडीमार्फत कोर्टात केला गेला. मुंबईच्या सत्र न्यायालयात ईडीचे विशेष पीएमएलए कोर्ट आहे. संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी तर ईडीचे वकील हितेन विनेगावकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्यातून लाटण्यात आलेली रक्कम संजय राऊत यांना प्रविण राऊतांकडून मिळाली होती, असा आरोप ईडीने केला आहे.

ED च्या तपासात आणखी काय उघड?

संजय राऊत ईडीच्या कोठडीत असताना ईडीने मुंबई आणि परिसरात आणखी काही ठिकाणी छापेमारी केली. त्यावरून आम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र मिळाले असल्याचं ईडीतर्फे आज कोर्टात सांगण्यात आलं. 2010 ते 2011 च्या दरम्यान महिन्याला 2 लाख रुपये संजय राऊतांना मिळत होते. याच पैशांतून राऊतांचे सगळे खर्च भागवले जात होते, असा आरोप ईडीने केला आहे. – दोन दिवसांपूर्वीच ईडीने मुंबई आणि परिसरात छापेमारी केली. यावेळी संजय राऊत कोठडीत होते. यावेळी समोर आलेल्या माहितीनुसार, अलिबागमधील जमिनीची मालमत्ता खरेदी करण्यासाठी जवळपास 3 कोटी रकमेचा वापर केला आहे.- त्यामुळे संजय राऊतांच्या घरी सापडलेली रक्कम आणि ही रक्कम हे सगळे व्यवहार रडारवर आहेत. – परदेशी दौऱ्याबाबत झालेल्या खर्चाचाही तपास करायचा आहे. या व्यवहाराबाबत संजय राऊत यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाही, असं ईडीने कोर्टात सांगितलं. संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी केलेल्या छापेमारीत साडे अकरा लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. मात्र त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर 55 लाख रुपये वळते केल्याचे दिसून आले. ही रक्कम प्रवीण राऊतांच्या पत्नीकडून आल्याचंही तपासात उघड झाल्याची माहिती मिळाली आहे.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.