AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार, संजय राऊतांची मोठी घोषणा, मुंबई पोलिसांची चौकशी सुरू

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, माझे शब्द लिहून ठेवा. या प्रकरणात ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाऊ शकतात. ही चोरी, लफंगेगिरी आहे. कोट्यवधी रुपये नेमके कुठे जातायत? हा पैसा पीएम केअर फंडमध्ये जातोय का, असा सवाल त्यांनी केला.

माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार, संजय राऊतांची मोठी घोषणा, मुंबई पोलिसांची चौकशी सुरू
संजय राऊत.
Updated on: Mar 08, 2022 | 4:57 PM
Share

मुंबईः ईडी (ED) आणि त्यांचे काही अधिकारी भाजपची (BJP) एटीएम मशीन झाले आहेत. माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत, अशी घोषणा शिवसेना (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. विशेष म्हणजे राऊत यांनी यावेळी या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली असल्याची माहिती दिली. ईडी हे सारे भाजपच्या काही नेत्यांच्या संगनमताने करत असून, त्यातून खोऱ्याने पैसा गोळा करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप यावेळी राऊत यांनी केला. तसेच येणाऱ्या काळात ईडीसोबतच्या त्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.

काय म्हणाले राऊत?

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलिसांत एक तक्रार आम्ही दाखल करतोय. या ‘एफआयआर’नुसार मुंबई पोलीस आयुक्तांना भ्रष्टाचाराबाबत, खंडणीबाबत तक्रार देतोय. चार ईडी अधिकाऱ्यांसह नौलानीबाबत आम्ही तक्रार करतोय. मुंबई पोलीस आजपासून याची चौकशी करत आहेत. त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की, मुंबई पोलीस याप्रकरणाची आजपासून चौकशी सुरू करत आहेत, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

पैसा विदेशात जातोय

संजय राऊत म्हणाले की, माझे शब्द लिहून ठेवा. या प्रकरणात ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाऊ शकतात. ही चोरी, लफंगेगिरी आहे. कोट्यवधी रुपये नेमके कुठे जातायत? हा पैसा पीएम केअर फंडमध्ये जातोय का, असा सवाल त्यांनी केला. हा सारा पैसा विदेशात जातोय. त्या मागे खूप मोठे रॅकेट आहे. यामध्ये भाजपचे नेतेही सहभागी आहेत. तुम्हाला याची माहिती देतोय. हे हवेत बोलत नाही. पुढच्या पत्रकार परिषदेत त्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. काही जण कागदांवर बोलताना ना. आम्हीही ईडीला कागद दिलाय, पण त्याकडे तर कुणी पाहिलं नाही. आता मुंबई पोलीस अख्ख्या विश्वात बेस्ट आहे. तेच याची चौकशी करतील, असा इशारा त्यांनी दिला.

इतर बातम्याः

सुमीत कुमार नरवरकडे भाजपच्या महाराष्ट्र, दिल्लीतील बड्या नेत्याचा पैसा, लवकरच पर्दाफाश करणार; राऊतांचा गौप्यस्फोट

भाजप नेते, ईडीच्या भ्रष्टाचाराचे मुखवटे फाडणार, पत्रकार परिषदेआधी राऊतांची पुन्हा डरकाळी

Sanjay Raut PC : ईडी, आयटीच्या धाडी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का? संजय राऊतांचा हल्लाबोल

माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा
माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा.
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?.
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्.
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल.
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र.
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान.
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?.
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप.
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले.