Sanjay Raut | नंबर आमचेच पण ‘अँटी सोशल’ म्हणून फोन टॅप… 2019 मधील फोन टॅपिंगबाबत संजय राऊत काय म्हणाले?

महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाचे फोन टॅपिंग प्रकरण उघड झाल्यानंतर रश्मी शुक्लांना आता केंद्र सरकार पाठीशी घालतंय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut | नंबर आमचेच पण 'अँटी सोशल' म्हणून फोन टॅप... 2019 मधील फोन टॅपिंगबाबत संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना खासदार संजय राऊत Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 10:50 AM

मुंबईः गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी 2019 मध्ये एकनाथ खडसे, माझे आणि इतरां फोन टॅपिंग केले. विशेष म्हणजे या प्रकारात आमचेच मोबाइल नंबर मात्र केंद्र सरकारकडून परवानगी मागताना अँटी सोशल एलिमेंट्स (Anti social Elements) असं म्हणत अर्ज केला गेला, असा धक्कादायक आरोप आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. एकनाथ खडसे, संजय राऊत आणि अन्य चौघांचे फोन त्यावेळी टॅप झाले. टॅपिंगची परवानगी घेताना आमच्यापैकी कुणाला ड्रग्स पेडलर तर गुणाला गँगस्टर म्हटलं गेलंय, महाविकास आघाडी सरकार स्थापन करते वेळी आमच्या संवादावर लक्ष ठेवण्यासाठी हा प्रकार केला गेल्याचा आरोपदेखील संजय राऊत यांनी केला.

काय म्हणाले संजय राऊत?

फोन टॅपिंग प्रकरणी आरोपी असलेल्या रश्मी शुक्लांबाबत आज धक्कादायक खुलासा करताना संजय राऊत म्हणाले, ‘ 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन होताना रश्मी शुक्लांनी फोन टॅप केले. नावं आमचीच पण म्हटलंय अँटी सोशल एलिमेंट्स. रश्मी शुक्लायांनी ज्यांचे ज्यांचे फोन टॅप केले.. त्या सगळ्यांचे एन्टी सोशल इलेमेन्ट्स दाखवून आमच्यावर पाळत ठेवली गेली.. मग त्यात नाना पटोले, संजय राऊत असो वा आणखी त्यात चार लोकांची नावं आहेत. सर्वांना अँटी सोशल एलिमेंट्स दाखवून फोन टॅप केले गेले. कुणाला ड्रग्स पेडलर म्हटलंय.. कुणाला गँगस्टर म्हटलंय.. जेव्हा सरकार बनत होतं, तेव्हा हे सगळं सुरु होतं.. 2019 मध्ये.. आमच्यावर पाळत ठेवून सरकारमध्ये काय चर्चा होते.. आम्ही काय बोलतो, याची प्रायव्हसी भंग करण्यात आली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

रश्मी शुक्लांना आता केंद्र सरकारचं अभय?

तेव्हाच्या फोन टॅपिंग प्रकरण उघड झाल्यानंतर रश्मी शुक्लांना आता केंद्र सरकार पाठीशी घालतंय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले ,’ पोलिस अधिकारी जो निष्पक्ष काम करेल, अशी अपेक्षा असते.. पण त्यानं राजकीय फायद्यासाठी काम केलं.. आणि अशा पोलीस अधिकाऱ्याला केंद्र सरकार पाठीशी घालतंय, हे दुर्भाग्यपूर्ण. महाविकास आघाडी सरकार बनण्याची प्रक्रिया सुरु असताना, फोन ऐकले जात होते. आता हे सगळं उघड झाल्यावर. तेव्हाच्या त्या एसआयटी कमिशनर रश्मी शुक्ला. गुन्हे दाखल झाले. आता केंद्रातील भाजप सरकार रश्मी शुक्ला यांना पाठबळ देतंय ते अत्यंत चुकीचं आहे, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण काय?

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात मार्च महिन्यात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी भाजप नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत आदींचे फोन 2019 मध्य टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रश्मी शुक्लांची दोन वेळा चौकशी झाली आहे. तसेच पुणे पोलीस आयुक्त असताना काँग्रेस प्रदेशाध्यश्र नाना पटोले यांच्यासह बच्चू कडू, आशीष देशमुख, संजय काकडे यांसारख्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाचा तपासही सुरु आहे.

इतर बातम्या-

Somaiya on Thackeray: उद्धव ठाकरेंची माफियागिरी, माझ्यावर 12 आरोप लावले, चौकशीच्या तिसऱ्या दिवशी सोमय्यांचा हल्लाबोल

Amravati : सोयाबीन बहरुनही उत्पादन घटण्याचा धोका, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी हवालदिल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.