उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे ठाकणार ? संजय राऊत यांचे संकेत काय ? काय म्हणाले राऊत…

उद्धव ठाकरे हे भविष्यात राष्ट्रीय राजकारणात दिसणार का ? या प्रश्नावर उत्तर देत असतांना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे ठाकणार ? संजय राऊत यांचे संकेत काय ? काय म्हणाले राऊत...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 5:45 PM

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या विरोधात विरोधी पक्षनेत्यांची मोट बांधणं गरजेची असून त्यासाठी शिवसेने पुढाकार घेण्यास सुरुवात केली असल्याचे संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हंटलं आहे. याशिवाय उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे राष्ट्रीय राजकारणात यावे अशी आमची इच्छा आहे आम्ही त्यांना त्याबाबत त्यांना सांगितले असून त्याबाबत ते लवकरच निर्णय घेतील असं सांगत संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत भेट झाली होती त्याचा संदर्भ देत विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी एकत्र येण्याची सुरुवात झाल्याचेही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

खरंतर गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याचे चर्चा होती. त्यावर संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितले आहे की, आम्ही सर्वांनी उद्धव ठाकरे यांना दिल्लीत येऊन विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सांगितलं आहे. त्याबाबत ते लवकरच विचार करतील.

मागील काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी काही विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यावेळी बिहार मधील काही नेत्यांची भेट घेतल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे. मात्र, यामध्ये उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षांचे प्रमुख असतील का ? याबाबतही संजय राऊत यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांचा चेहरा उत्तम आहे. अनेकांना वाटतं त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे नेतृत्व करावे. मात्र, सध्या विरोधी पक्षांना सध्या एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हंटले आहे. त्यानंतर नेता कोण आहे हे ठरविले जाईल, मात्र उद्धव ठाकरे देखील एक विरोधी चेहरा राहू शकतो असेही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत असतांना संजय राऊत यांनी आमचीच खरी शिवसेना असल्याचे म्हंटले आहे. आम्ही म्हणजेच शिवसेना असा दावा करीत असतांना देशाच्या राजकारणात अनेक वेळेला मुद्दे उपस्थित करण्यात आले तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

सुरुवातीपासूनच देशाच्या राजकारणात शिवसेनेची भूमिका नेहमीच पुढे राहिली असल्याचे संजय राऊत यांनी सांगत पुढील काळातही शिवसेना विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करील असे म्हंटलं आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणात जाणार का ? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.