तहसीलदारांच्या संमतीपत्रानंतरच कोरोना मृतांच्या वारसांना 50 हजारांचे सानुग्रह अनुदान
तहसीलदारांच्या संमतीपत्रानंतर कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
नाशिकः तहसीलदारांच्या संमतीपत्रानंतर कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे. त्याअनुषंगाने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती शासनाकडून अधिसूचित करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांच्या 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा नियंत्रण कक्ष (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग), जुना आग्रारोड, नाशिक-1, 0253-2315080 व 2317151 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 येथे संपर्क साधावा. त्याचप्रमाणे www.nashik.gov.in या संकेतस्थळावर आणि ddmanashik@gmail.com या ई मेलवर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोनाने मृत झाला असेल, तर त्याच्या नावावरचे सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून एकपेक्षा जास्तही अर्ज येऊ शकतात. हे लक्षात घेता अनुदान मिळवण्यासाठी आता वारसांना तहसीलदारांची स्वाक्षरी असलेले संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
खासगी संस्थाना कागदपत्रे देवू नका
मदत व पुनर्वसन विभागाकडून सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपद्धतीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. तसेच सानुग्रह अनुदानाबाबत कोणत्याही खासगी व्यक्ति किंवा संस्था यांना कागदपत्रे देवू नये, याबाबत पैशांची मागणी झाल्यास वरील नमूद पत्त्यावर तक्रार करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
समितीची स्थापना करणार
मृत कोविड रुग्णांच्या वारसांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत एका समितीची स्थापना केली जाणर आहेत. त्यात निवासी उपजिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे प्रतिनिधी असतील. ही समिती मदत देण्याबाबतच्या साऱ्या प्रकरणांवर करडी नजर ठेवणार आहे. (Sanugrah grant of Rs 50,000 to the heirs of Corona deceased only after the consent of the tehsildar)
इतर बातम्याः
Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!https://t.co/rIFR65qDOq#SpecialReport|#PabloNeruda|#Poet|#RevolutionaryPoet|#Chile
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021