काश्मिरची कली साताऱ्याच्या पाटलांची सून, माप ओलांडताना खास उखाणा

साताऱ्याचा पुत्र आणि काश्मीरच्या कलीच्या प्रेमकहाणीत असलेला कलम 370 चा मोठा अडथळा दूर झाला आणि दोघं विवाहबद्ध झाले

काश्मिरची कली साताऱ्याच्या पाटलांची सून, माप ओलांडताना खास उखाणा
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 10:53 AM

कराड : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याचा फायदा सातारच्या पठ्ठयाला झाला आहे. कराडचे अजित पाटील (Ajit Patil) आता काश्मीरचे जावई झाले आहेत. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या पाटलांनी काश्मीरच्या सुमन देवीसोबत (Suman Devi) विवाह केला. आधी किस्तवाडमध्ये काश्मिरी पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली, तर नंतर कराडमध्ये महाराष्ट्रीय पद्धतीने काश्मिरी नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी करण्यात आली. (Satara Armyman Ajit Patil marries Kashmir Girl Suman Devi)

साताऱ्याचा पुत्र आणि काश्मीरच्या कलीच्या प्रेमकहाणीचं लग्नात रुपांतर होण्यात मोठा अडथळा होता कलम 370 चा. यामुळे अजित आणि सुमन देवी काही महिने निराश होते. मात्र कलम हटवलं आणि अजितने लग्नाचा बार उडवून दिला. अजित यांचा विवाह 27 नोव्हेंबर 2020 रोजी मोजक्या कराडकर नातेवाईकांच्या उपस्थितीत जम्मू काश्मीरमधील पार पडला.

सोयरीक कशी जुळली?

अजित प्रल्हाद पाटील हा कराड तालुक्यातील उंडाळे गावातील रहिवासी. भारतीय सैन्य दलात सैनिकी शिक्षणाचे तो प्रशिक्षण देतो. सध्या तो झाशीत कार्यरत आहे. याच ठिकाणी राहणाऱ्या काश्मीरच्या सहकाऱ्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या जम्मू कश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावात राहणाऱ्या सुमन देवी भगतशी त्याची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांकडून प्रेमाचे अंकुर फुलले.

तीन महिन्यात प्रेम फुललं

अजित पाटील मार्च 2020 मध्ये सुमनच्या नातेवाईकासोबत 10 दिवसाच्या सुट्टीवर जम्मू काश्मीरला गेले होते कोरोनामुळे अचानक देशभर लॉकडाऊन जाहीर झाला आणि तब्बल तीन महिने सुमन देवीच्या घरी अजित पाटील यांना राहावे लागले. याच तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचे नाते आणखी घट्ट झाले. सुमन देवी यांच्या कुटुंबीयांना अजित यांना जवळून समजुन घेता आले आणि सर्वांच्या संमतीने दोघांची लग्नगाठ पक्की झाली .

सरकारने जर 370 कलम हटवले नसते तर आम्ही लग्न करु शकलो नसतो. 370 कलम हटवल्याचा सर्वात जास्त फायदा मला झाला. माझ्यासाठीच कलम हटवल्याची भावना अजित पाटील यांनी व्यक्त केली.

सुमनचा उखाणा

वन बोटल टू ग्लास, अजित मेरा फर्स्ट क्लास

अजित पाटील यांचा उखाणा

संभाजीराजे शिवछत्रपतींचा छावा, सुमनचं नाव घेतो शिवरायांचा मावळा

(Satara Armyman Ajit Patil marries Kashmir Girl Suman Devi)

आईलाही अप्रूप

मुलगा देशसेवेचं काम करत असून मुलाच्या आनंदातच माझं सुख आहे. त्यामुळे समाज काय म्हणेल याची फिकीर नव्हती. सुमन माझी सून नाही, तर मुलगीच असल्याचं अजितच्या आई रंजना पाटील सांगतात.

महाराष्ट्राच्या सूनबाई झालेल्या सुमनदेवी भगत बारावीचं शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील लोकांसह येथील राहणीमान तिला आवडलं. मुलींना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचं तिला मोठं अप्रूप वाटतं.

370 कलम हटल्याने काश्मीरची नाजूक सुमन आणि मराठमोळा रांगडा अजित यांची प्रेम कहाणी विवाहाने संपली असली तरी सातारा जिल्ह्यात मात्र या लग्नाची गोष्ट अभिमानाने चर्चिली जात आहे

संबंधित बातम्या :

स्वीडनची लेक बनली सांगलीची सून

फॉरेनची पाटलीन! जर्मनचं वऱ्हाड अहमदनगरमध्ये!

(Satara Armyman Ajit Patil marries Kashmir Girl Suman Devi)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....