महाराष्ट्राचं मिनी काश्मीर खुलं, महाबळेश्वरमध्ये पर्यटनाला सशर्त परवानगी

मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये (mahabaleshwar) पर्यटनास परवानगी देण्यात आली आहे. अनलॉक प्रक्रिये अंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. (Satara District Collector issued orders to start tourism in mahabaleshwar)

महाराष्ट्राचं मिनी काश्मीर खुलं, महाबळेश्वरमध्ये पर्यटनाला सशर्त परवानगी
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 11:49 AM

सातारा : मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये (mahabaleshwar) पर्यटनास परवानगी देण्यात आली आहे. अनलॉक प्रक्रिये अंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाचगणी, वेण्णा लेक येथील नौका विहार, घोडेस्वारी आणि टॅक्सी व्यवसाय सुरु होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने काही नियमावलीही जाहीर केली आहे. (Satara District Collector issued orders to start tourism in mahabaleshwar)

मिनी काश्मीर म्हणजेच महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळं गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटनक नाराज होते. मात्र, मोठ्या प्रतिक्षेनंतर आता अनलॉक प्रक्रियेंतर्गत महाबळेश्वरमध्ये पर्यटन करण्यास काहीशा प्रमाणात परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने काही अटी घातल्या आहेत. वेण्णा लेक येथील नौका विहार, घोडे सवारी आणि टॅक्सी व्यवसाय सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. तसेच पाचगणी येथेही नौकाविहार करता येईल. महाबळेश्वर, वेण्णा, पाचगणी व्यतिरिक्त बाकीची पर्यटनस्थळं बंदच राहतील. त्याचबरोबर बंद असलेल्या पर्यटनस्थळांच्या परिसरात घोडेस्वारी करण्यास बंदी असेल.

पर्यटनासाठी काही महत्त्वाचे नियम

सातारा जिल्हा प्रशासनाने पर्यटनास सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार काही अटी घालण्यात आल्या आहेत. घोडेस्वारीसाठी वापरण्यात येणाऱ्या घोड्यांची वैद्यकीय चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच व्यवसाय सुरु करण्यापूर्वी घोडेचालक आणि मालक या दोघांची कोरोना चाचणी केलेली असने गरजे आहे. वेण्णा येथे नौकाविहार करायचे असल्यास एका बोटीत 6 पर्यटक आणि 1 घोडेस्वार असे एकूण सात जणच बसू शकतील. तसेच  बोट सॅनिटाईझ करणे बंधनकारक असेल. एका बोटीच्या दिवसभरातून फक्त दोनच फेऱ्या करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सहली अथवा ग्रुपने बोटींग करण्यास मनाई असेल. टॅक्सीमध्ये प्रवास करताना पर्यटकांना एका वेळी तिघांना प्रवास करता येईल. तसेच टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यात पडदा असणे बंधनकारक आहे.

दरम्यान, गेल्या सात महिन्यांपासून पर्यटन व्यवसाय बंद असल्याने पर्यटक नाराज होते. आता पर्यटनस्थळं काहीशा प्रमाणात सुरु झाल्याने पर्यटनक आणि व्यावसायिकांकडून आनंद व्यक्त केला जातोय. सध्या पाचगणी, वेण्णा येथील नौकाविहार आणि घोडेस्वारी सुरु झाली आहे. पण लवकरच अन्य पर्यटनस्थळंही पूर्ण क्षमतेने सुरु होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यात पर्यटन व्यवसाय ठप्प, 500 कोटींचा फटका

ताडोबापाठोपाठ नवेगाव व्याघ्र पर्यटन 1 नोव्हेंबरपासून सुरु, केवळ 50 टक्के पर्यटकांना वाहनात प्रवेश

कोकणाच्या धर्तीवर मराठवाड्यात ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम-अब्दुल सत्तार

(Satara District Collector issued orders to start tourism in mahabaleshwar)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.