Satara : अल्पवयीन बालिकेच्या अपहरणाची तक्रार अखेर सातारा शहर पोलिसांत दाखल, शंभूराजे देसाईंनी घेतली पीडित दाम्पत्याची भेट

संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून बाबर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. याचा सखोल तपास सातारा पोलीस करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. या प्रकरणाचा सातारा पोलीस योग्य तपास करून सत्य समोर आणतील असेही शंभूराज देसाई म्हणाले.

Satara : अल्पवयीन बालिकेच्या अपहरणाची तक्रार अखेर सातारा शहर पोलिसांत दाखल, शंभूराजे देसाईंनी घेतली पीडित दाम्पत्याची भेट
शंभूराजे देसाईंनी घेतली पीडित दाम्पत्याची भेट
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 4:53 PM

सातारा : साताऱ्यात दीड वर्षाची बालिका चोरी प्रकरणाच्या तपासानंतर अखेर सातारा पोलिसांनी मंगळवार पेठेतील कुचेकर(Kuchekar) दाम्पत्यांच्या दीड वर्षाच्या बालिकेचे अपहरण झाले असल्याची तक्रार अखेर शहर पोलिसांत(City Police) दाखल केली आहे. या प्रकरणी बाबर(Babar) दाम्पत्यावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून बाबर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. याचा सखोल तपास सातारा पोलीस करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. या प्रकरणाचा सातारा पोलीस योग्य तपास करून सत्य समोर आणतील असेही शंभूराज देसाई म्हणाले. दरम्यान गृहराज्यमंत्र्यांनी कुचेकर दाम्पत्याची घरी जाऊन विचारपूस करत कुटुंबियांना धीर दिला आहे. (A complaint of abduction of a minor girl has finally been lodged with the Satara city police)

बालिका सध्या म्हसवडच्या बालसुश्रुषागृहात

बालकल्याण समितीच्या आदेशावरून सध्या बालिकेला म्हसवडच्या बालसुश्रुषागृहात ठेवण्यात आले आहे. बालकल्याण समिती बालिकेच्या कस्टडीबाबत जो निर्णय देईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बोऱ्हाडे यांनी सांगितले. आरोपींच्या चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही बोऱ्हाडे नमूद केले होते.

खाजगी सावकारीच्या संशयातूनही तपास सुरु

हा सर्व प्रकार दोन्ही बाजूने संशयास्पद असल्यामुळे शहर पोलिस विविध बाबींच्या अनुषंगाने याचा तपास करीत आहेत. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणात खाजगी सावकारीचा काही प्रकार आहे का, या अनुषंगानेही तपास करीत आहेत. बाबर दाम्पत्य जर खाजगी सावकारी करीत असेल तर त्यासंदर्भात काही पुरावे हाती लागतात का हेही तपासले जातील. त्यासाठी त्यांच्या घराची झडती घेतली जाईल. तसेच काही साक्षीदार किंवा इतर पुरावे तपासून पुढील कारवाई केली जाईल, असेही बोऱ्हाडे यांनी सांगितले. (A complaint of abduction of a minor girl has finally been lodged with the Satara city police)

इतर बातम्या

Pimpri Chinchwad crime | मेट्रोमोनिअल साईटवरून ओळख मग लग्नाच्या आणाभाका अन…. बलात्कार करून आरोपी फरार ; नेमकं काय घडलं

Satara Crime : सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी 5 जणांची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणांनी टोकाचे पाऊल का उचलले ? वाचा सविस्तर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.