ऑपरेशन मेघदूतमधील जखमी जवानाचा मृत्यू; साताऱ्यात उद्या येणार पार्थिव; सियाचीनमध्ये झाले होते जखमी
सियाचीनसारख्या परिसरात ते देशसेवा बजावत असतानाच त्यांच्या प्रकृतीत बिघड झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते, मात्र फारशी सुधारणा झाली नव्हती, त्या परिस्थितीमध्येच त्यांचे आज निधन झाले
साताराः सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे (Bhose) या गावाचे जवान विपुल दिलीप इंगवले (Vipul Ingwale) सियाचीनमध्ये ऑपरेशन मेघदूत (Opration Megdhut) बजावत असताना त्यांची तब्बेत बिघडली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये वर्षभरापूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचार सुरु असताना कमांड हॉस्पिटलमध्येच त्यांचे निधन झाले आहे. विपुल इंगवले यांच्या निधनामुळे भोसे गावावर शोककळा पसरली आहे. उद्या सोमवारी त्यांचे पार्थिव त्यांच्या भोसे या गावी आणले जाणार आहे.
सियाचीन येथे -39° सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदूत बजावत असताना शहीद विपुल इंगवले यांची तब्बेत बिघडली होती. त्यानंतर तात्काळ त्यांना सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कमांड हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे त्यांना पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुणे येथे त्यांना दाखर केल्यानंतर त्यांच्यावर वर्षभरापासून उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र प्रचंड थंडी असताना त्यांच्या तब्बेतीत बिघाड झाला होता.
धोकादायक वातावरणात देशसेवा
सियाचीनसारख्या परिसरात ते देशसेवा बजावत असतानाच त्यांच्या प्रकृतीत बिघड झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते, मात्र फारशी सुधारणा झाली नव्हती, त्या परिस्थितीमध्येच त्यांचे आज निधन झाले त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयासह भोसे गावाला धक्का बसला आहे.
देशसेवा बजावत असतानाच काळाचा घाला
शहीद जवान विपुल इंगवले यांनी भारतीय सैन्य दलात देशातील विविध भागात देशसेवा केली आहे. सियाचीनमध्ये देशसेवा बजावत असतानाच ते जखमी झाले होते. विपुल इंगवले यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दीड वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
विद्यार्थीदशेपासूनच देशसेवेच वेड
विपुल इंगवले यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना देशसेवेचे वेड होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच व ते एनसीसीमध्ये असतानात दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्यांची निवड झाली होती. त्यावेळेपासून त्यांना देशसेवेचे वेड लागले होते. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मेहनत आणि कष्ट करुन भारतीय सैन्यात दाखल झाले होते. मात्र सियाचीन येथे देशसेवा बजावत असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर वर्षभर त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्बेत आणखी जास्त बिघडली होती, त्यातच आज त्यांचा कमांड रुग्णालयातच मृत्यू झाला. त्यांच्या या निधनामुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. उद्या त्यांचे पार्थिव साताऱ्यातील भोसे या गावी येणार आहे.