“राष्ट्रवादी नंबर वनला गेली, ठाकरे यांचा पक्ष 5 वर गेला”; संजय राऊत यांना या मंत्र्याने सडेतोड प्रत्युत्तर दिलं

ठाकरे गटावर टीका करताना ते म्हणाले की, तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलं पण सत्ता सगळी राष्ट्रवादी पक्षानं भोगली होती. शासनाचा सगळा निधी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.

राष्ट्रवादी नंबर वनला गेली, ठाकरे यांचा पक्ष 5 वर गेला; संजय राऊत यांना या मंत्र्याने सडेतोड प्रत्युत्तर दिलं
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 10:49 PM

मुंबईः होळीचा जल्लोष राज्यभर साजरा होत असतानाच राज्यात राजकीय धुळवडही जोरदार सुरू असल्याचे दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी एकमेकांवर केलेल्या आरोपांना उत्तर-प्रत्युत्तर देत राजकीय विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केला आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली नसली तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भाजप तुमचा वापर करते आहे आणि ते तुम्हाला भविष्यात कळेल असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला होता. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत मंत्री शंभूराज देसाई यांना ठाकरे गटाच्या वर्मावरच घाव घातला.

भाजप तुमचा वापर करतय हे भविष्यात तुम्हाला कळेल असा सतर्कतेचा इशारा संजय राऊत यांना दिला होता. त्या टीकेला प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे की, गेल्या अडीच वर्षात त्यांनी तर कुणी कुणाचा वापर केला आहे हे कळालं असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री केले मात्र नंबर वनला गेलं कोण तर राष्ट्रवादी काँग्रेस.आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष गेला पाच नंबरवर. त्यामुळे फायदा कुणाला आणि तोटा कुणाला झाला याचा एकदा तुम्हीच विचार करा असा टोलाही शंभूराज देसाई यांना लगावला.

ठाकरे गटावर टीका करताना ते म्हणाले की, तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलं पण सत्ता सगळी राष्ट्रवादी पक्षानं भोगली होती. शासनाचा सगळा निधी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.

राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी देण्यात आला आणि तुम्हाला फक्त मुख्यमंत्री पद दिले असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.