Satara : शेततळ्यात बुडून सख्या भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दुर्दैवी घटना

ही दोन्ही मुले सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेततळ्याकडे फिरायला गेली होती. शेततळ्याजवळून जात असताना सौरभ पवार याचा पाय घसरला आणि तो तळ्यात पडला. भावाला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी पायलने पाण्यात उडी मारली आणि दोघेही बुडाले.

Satara : शेततळ्यात बुडून सख्या भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दुर्दैवी घटना
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 11:04 PM

सातारा : शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज साताऱ्यातील पाटण तालुक्यातील रोमनवाडी गावात घडली आहे. सौरभ अनिल पवार (16) व पायल अनिल पवार (14)अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. भाऊ-बहिणीच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पाटण पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीचाही मृत्यू

मयत सौरभ आणि पायल ही मुले मूळी पाटण तालुक्यातील काठी गावातील रहिवासी आहेत. सौरभ आणि पायल आपल्या आई वडिलांसोबत रोमनवाडी येथील सचिन जाधव यांच्याकडे पाहुणे आले होते. यावेळी ही दोन्ही मुले सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेततळ्याकडे फिरायला गेली होती. शेततळ्याजवळून जात असताना सौरभ पवार याचा पाय घसरला आणि तो तळ्यात पडला. भावाला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी पायलने पाण्यात उडी मारली आणि दोघेही बुडाले. ही बाब सचिन जाधव आणि मुलांच्या आई वडिलांना कळताच त्यांनी तात्काळ शेततळ्याकडे धाव घेतली. त्यानंतर शिरोळ तालुक्यातील मासेमारी करणाऱ्या लोकांनी दोन्ही मुलांना बाहेर काढले. या घटनेची माहिती पाटण पोलिसांना देण्यात आली. मयत सौरभ हा रेठरे येथे आयटीआय शिकत होता. तर मुलगी पायल विजयनगर येथे इयत्ता आठवीत शिकत होती.

चार दिवसांपूर्वी नांदेडमध्येही शेततळ्यात दोन मुले बुडाली

गेल्या आठवड्यात नांदेडमध्येही अशाच प्रकारची घडली होती. शेततळ्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्राचाही बुडून मृत्यू झाला होता. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील बन चिंचोली गावात 12 जानेवारी रोजी शेततळ्यात पडून दोन युवकांचा मृत्यू झाला. संजय कवाने(18) आणि दत्ता जटाळे(20) अशी मयत युवकांची नावे आहेत. यातील दत्ता हा मासे पकडण्यासाठी शेततळ्यात उतरला असता तो बुडत होता. हे पाहून त्याला वाचवण्यासाठी संजयने पाण्यात उडी घेतली. या घटनेत दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने बन चिंचोली गावांवर शोककळा पसरली. (Brother and sister drowned in a pond in Patan taluka of Satara)

इतर बातम्या

Wardha : अवैध गर्भपात प्रकरणात आरोग्य संचालकांनी केली अभ्यासगटाची स्थापना, समितीला दहा दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना

Pen Crime : पेणमध्ये स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले, 56 लाखाची रक्कम लंपास

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.