“नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पैशाच्या गोडावूनची माहिती तपास यंत्रणांना द्यावी”; राणेंच्या आरोपांची ठाकरे गटाने खिल्ली उडवली
नितेश राणे यांच्याकडून असे बेछूट आरोप करण्यात आले आहेत. पण आमचे म्हणणे तेच आहे की सरकार तुमचे आहे तर राष्ट्रीय तपास यंत्रणांना तुम्ही माहिती द्या असा सल्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी दिला आहे.
कराड/सातार : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गट विरुद्ध शिवसेना आणि भाजप असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळतो आहे. त्याच बरोबर ठाकरे गट आणि भाजपमध्ये असलेल्या राणे कुटुंबीयांकडूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केली जात असते. नितेश राणे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असते. यावेळीही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्म हाऊसवर पैशाच्या गोडावून असल्याची टीका तत्यांनी केली होती.
त्यांच्या त्या आरोपांना सचि अहिर यांनी उत्तर देताना त्यांनी म्हटले आहे की, नितेश राणे यांनी त्यांची ही माहिती तपास यंत्रणांना द्यावी, कारण निदान तपास यंत्रणा तरी त्याबाबत तपास करतील असा टोला लगावला आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून वारंवार ठाकरे कुटुंबीयांवर अनेक आरोप केले जातात. आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांच्याकडून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून त्यांच्या जहरी टीका केली जात असते.
त्याच प्रकारची त्यांनी आताही टीका केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कर्जतमध्ये त्यांचे पैशाचे गोडावून असल्याचा त्यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यावर सचिन अहिर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा वाद वाढण्याच शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्म हाऊसवर पैशाचे गोडावून असल्याची टीका केली होती. या टीकेला माजी मंत्री शिवसेना नेते आमदार सचिन अहिर यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.
नितेश राणे यांनी स्वतः त्याठिकाणी तपास करण्यास यावे आणि त्यांच्याकडे एवढीच खरी माहिती आहे तर त्यांनी ती तपास यंत्रणांना पैशाच्या गोडावूनची माहिती द्यावी असा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
यापूर्वीही नितेश राणे यांच्याकडून असे बेछूट आरोप करण्यात आले आहेत. पण आमचे म्हणणे तेच आहे की सरकार तुमचे आहे तर राष्ट्रीय तपास यंत्रणांना तुम्ही माहिती द्या असा सल्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी दिला आहे.
ते कराडमधील कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हा सल्ला राणे यांना दिला आहे.