Satara Crime : साताऱ्यात हनीट्रॅपद्वारे तरुणांना जाळ्यात अडकवून खंडणी मागणाऱ्या जोडप्याचा पर्दाफाश

साताऱ्यातील वाई तालुक्यात हनी ट्रॅपद्वारे अनेक युवकांना आपल्या जाळ्यात ओढून एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या सहाय्याने तब्बल 2 लाख 89 हजार 500 रुपये खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत बोपेगाव येथील युवकाने तक्रार दाखल केली असून कवठे आणि सटालेवाडी येथील युवकांचीही अशीच फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

Satara Crime : साताऱ्यात हनीट्रॅपद्वारे तरुणांना जाळ्यात अडकवून खंडणी मागणाऱ्या जोडप्याचा पर्दाफाश
साताऱ्यात हनीट्रॅपद्वारे तरुणांना जाळ्यात अडकवून खंडणी मागणाऱ्या जोडप्याचा पर्दाफाशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:33 PM

सातारा : हनी ट्रॅप (HoneyTrap)द्वारे अनेक युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या पैसे उकळणाऱ्या जोडप्याचा वाई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पूनम हेमंत मोरे (30) आणि हेमंत विजय मोरे (31) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या जोडप्याची नावे आहेत. या जोडप्याने आतापर्यंत 2 लाख 89 हजार 500 रुपये खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. या जोडप्याने अजूनही अनेक युवकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त केला जात असून अशा व्यक्तींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. दरम्यान या घटनेमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे. (In Satara police arrested a couple who were trying to seduce a young man with a honeytrap and demand ransom)

बदनामी करण्याची धमकी देत तरुणांकडून पैसे उकळायचे

साताऱ्यातील वाई तालुक्यात हनी ट्रॅपद्वारे अनेक युवकांना आपल्या जाळ्यात ओढून एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या सहाय्याने तब्बल 2 लाख 89 हजार 500 रुपये खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत बोपेगाव येथील युवकाने तक्रार दाखल केली असून कवठे आणि सटालेवाडी येथील युवकांचीही अशीच फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. संशयित महिलेने व्हॉटस् अ‍ॅपवरून अश्लील चॅटिंग करून ते कुटुंबातील लोकांना दाखवून बदनामी करू, अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग केले. याप्रकरणी पूनम मोरे आणि हेमंत मोरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकाराने वाई तालुक्यात खळबळ उडाली असुन या पती-पत्नीने अजूनही अनेक युवकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त केला जात असून अशा व्यक्तींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचे आव्हान पोलिसांनी केल आहे. (In Satara police arrested a couple who were trying to seduce a young man with a honeytrap and demand ransom)

इतर बातम्या

Chandrapur Tiger Attack : चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 24 तासात दोघांचा मृत्यू

Nagpur Crime : नागपूरमध्ये जन्मदात्या पित्यानेच पैशासाठी नवजात बालिकेला विकले, दोन आरोपींना अटक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.