Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Crime : साताऱ्यात 15 हजारांसाठी विकली दीड वर्षाची मुलगी? खाजगी सावकारीच्या संशयातून तपास सुरु

हा सर्व प्रकार दोन्ही बाजूने संशयास्पद असल्यामुळे शहर पोलिस विविध बाबींच्या अनुषंगाने याचा तपास करीत आहेत. याबाबतची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणात खाजगी सावकारीचा काही प्रकार आहे का, या अनुषंगानेही तपास केला जाणार आहे.

Satara Crime : साताऱ्यात 15 हजारांसाठी विकली दीड वर्षाची मुलगी? खाजगी सावकारीच्या संशयातून तपास सुरु
साताऱ्यात 15 हजारांसाठी विकली दीड वर्षाची मुलगी? खाजगी सावकारीच्या संशयातून तपास सुरु
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 12:27 AM

सातारा : साताऱ्यात धक्कादायक प्रकार घडला उघडकीस आला आहे. अवघ्या 15 हजार रुपयांसाठी एका दाम्पत्याने पोटच्या दीड वर्षाच्या लहान मुलीला दुसऱ्या दाम्पत्याच्या ताब्यात दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलीची विक्री केली गेली कि खाजगी सावकारीतून हा प्रकार घडला गेला आहे? याचा सखोल सातारा जिल्हा पोलिसांमार्फत केला जात आहे. कुचेकर(Kuchekar) दाम्पत्याने 15 हजार रुपये घेऊन बाबर(Babar) दाम्पत्याकडे मुलीला दिल्यासह उघड झाले आहे. कुचेकर दाम्पत्याकडून जून 2021 मध्ये 15 हजार रुपये देऊन मुलीला आपल्या ताब्यात घेणाऱ्या बाबर दाम्पत्याविरुद्ध सातारा पोलीस(Satara Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एका लहान बाळाचा काही पैशांसाठी व्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आल्याने पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन अधिक तपास सुरु केला आहे. (Incident of selling a child for Rs 15,000 in Satara, Police begin investigation)

बाबर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

बाबर यांनी 15 हजार रुपये देऊन त्या मुलीला आपल्या ताब्यात घेऊन ठेवले. त्यांचे हे कृत्य निश्चितच चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांच्यावर कारवाई करीत आहोत, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले.

मुलीला म्हसवडच्या बालसुश्रुषागृहात केले दाखल

आपण या प्रकरणातील लहान मुलीला ताब्यात घेऊन बालकल्याण समितीपुढे हजर केले होते. समितीच्या आदेशावरून सध्या बाळाला म्हसवडच्या बालसुश्रुषागृहात ठेवले आहे. आता बालकल्याण समिती बाळाच्या कस्टडीबाबत जो निर्णय देईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. सध्या बाबर व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करीत आहोत. बाकी चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल, त्याआधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. संबंधित कायदेशीर बाबी पडताळून त्यांना अटक केली जाईल. दोघेही सद्यस्थितीत पोलीस स्टेशनमध्येच आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक बोऱ्हाडे यांनी दिली.

खाजगी सावकारीच्या संशयातूनही तपास

हा सर्व प्रकार दोन्ही बाजूने संशयास्पद असल्यामुळे शहर पोलिस विविध बाबींच्या अनुषंगाने याचा तपास करीत आहेत. याबाबतची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणात खाजगी सावकारीचा काही प्रकार आहे का, या अनुषंगानेही तपास केला जाणार आहे. बाबर दाम्पत्य जर खाजगी सावकारी करीत असेल तर त्यासंदर्भात काही पुरावे हाती लागतात का हेही तपासले जातील. त्यासाठी त्यांच्या घराची झडती घेतली जाईल. तसेच काही साक्षीदार किंवा इतर पुरावे तपासून पुढील कारवाई केली जाईल, असेही बोऱ्हाडे यांनी सांगितले. (Incident of selling a child for Rs 15,000 in Satara, Police begin investigation)

इतर बातम्या

Dapoli Crime : दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश, पैशाच्या देवाण-घेवाण व्यवहारातून घडली घटना

Wardha : कदम डॉक्टरच्या घरातील ‘त्या’ खोलीत आढळला कुबेराचा खजिना, तब्बल 97 लाख 42 हजार हस्तगत

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.