Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रिपद आणि युगेंद्र यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; प्रीतीसंगमावर म्हणाले, माझी चूक झाली…

Ajit Pawar on Maharashtra CM : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होत आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मुख्यमंत्रिपद आणि युगेंद्र यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; प्रीतीसंगमावर म्हणाले, माझी चूक झाली...
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 10:19 AM

आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 40 वा स्मृतिदिन आहे. या दिवसानिमित्त अजित पवार सध्या कराडमध्ये आहेत. कराडमधील प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत आहे, याबाबत काही निर्णय झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते आम्ही तिन्ही पक्षाचे नेते बसू आणि निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झालेली आहे. सर्व अधिकार मला दिले. एकनाथ शिंदे यांची काल नेता म्हणून निवड केली आहे. आता भाजपने नेते निवड कुणाची करायची काय नाही ते ठरवेलं असेल. आम्ही तिघंही नंतर एकत्र बसू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत, स्थिर सरकार देऊ, असं अजित पवार म्हणाले.

बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्ख पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी विधानसभेला उमेदवारी दिली. यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. युगेंद्र हा धंदापाणी करणारा आहे. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. माझ्या सख्ख्या भावाच्या मुलालाच माझ्या विरोधात उमेदवारी दिली. माझ्या सख्ख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली, चूक झाली, चूक झाली… पण माझी चूक झाली म्हणजे घरातलाच माणूस उभाकरायचा काय?, असं अजित पवार म्हणालेत.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला. त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. छत्तीसगड निवडून आलं तिथं ईव्हीएम चा घोटाळा झाला नाही का? लोकसभेला आमचा पराभव झाला तेव्हा पराभव मान्य केला. यश अपयश हे मतदारांच्या वरती अवलंबून असतं. चव्हाण साहेबांच्या साताऱ्यात एकही महाविकास आघाडीचा माणूस निवडून आला, असं अजित पवार म्हणाले.

बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ.
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?.
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं.
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार.
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात.
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?.
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा.
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत.