Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एवढे मोठे विकासपुरुष आहात तर लोकसभेला पराभव का झाला? उदयनराजेंना शिवेंद्रराजेंचा खोचक सवाल

नुसतं मंत्र्यांना भेटून फोटो काढून आणि त्यांचा चहा पिऊन विकास होत नसतो हे सातारकरांना चांगलंच माहिती आहे. नुसतं फोटोसेशन करू नका सातारकरांसाठी खरंच काहीतरी आणा अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी उदयराजेंवर टीका केली आहे.

एवढे मोठे विकासपुरुष आहात तर लोकसभेला पराभव का झाला? उदयनराजेंना शिवेंद्रराजेंचा खोचक सवाल
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 3:06 PM

साताराः सातारा नगरपालिकेच्या निवडणुका (Satara Municipal Elections) जवळ आल्यामुळे आता आमदार शिवेंद्रराजे (MLA Shivendra Raje) आणि खासदार उदयनराजे (MP Udayanaraje) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले पाहायला मिळत आहेत उदयनराजेंनी पत्र काढून केलेल्या आरोपांवर आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील आता सडेतोड उत्तर दिलं आहे. दिल्लीत केंद्राच्या विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करायचे, निवेदन देऊन शेकडो कोटी निधीचे आकडे पेपरमधून छापून आणायचे. पण, खरंच निधी आणला किती? असा सवाल करुन तुम्ही एवढे मोठे महान विकासपुरुष आहात तर, सातारा लोकसभेला तुमचा पराभव करून जनतेने तुम्हाला तुम्ही केलेल्या भरीव विकासाची पोचपावती का दिली? असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतः केलेली कुकर्मे लपत नाहीत. उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर आता नक्कीच करतील अशी जोरदार टीकाही आता त्यांच्यावर करण्यात आली आहे.

भली मोठी आकडेवारी फक्त छापायची

खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकाद्वारे खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले आहे की, शासनस्तरावर विविध विकासकामांसाठी पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. मात्र फक्त निवेदन देऊन फोटो काढायचा आणि भली मोठी आकडेवारी छापून बातमी प्रसिद्ध करायची, यातून कामे होतात का? असा सवाल करुन त्यांनी उदयनराजेंच्या कामाबाबतच सवाल उपस्थित केला आहे.

निवडणुका असल्या की मंत्र्यांची आठवण येते

तुम्ही 15 वर्षे खासदार होता त्यावेळी कार्यबाहुल्याच्या नावाखाली संसदेत एक दिवसही उपस्थित नव्हता. त्यावेळी का असे फोटोसेशन झाले नाही. पालिकेच्या कार्यकालास चार वर्ष आणि आठ- दहा महिने उलटले, निवडणूक लागल्यावरच तुम्हाला केंद्रीय मंत्र्यांची आठवण येते? शेवटच्या महिन्यातच बरं विकासकामांचा पाठपुरावा सुरु होतो, मोठमोठ्या घोषणा होतात आणि याचेच कुतूहल सातारकरांना आहे असा जोरदार टोलाही त्यांनी उदयनराजेंना लगावला आहे.

केवळ शोबाजी केली

कास धरणाची उंची आमच्यामुळे वाढली हे तुम्ही पत्रकातून स्वतः कबुल केले त्याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत. पहिल्यांदा तुम्ही खासदार झाला त्यावेळी रेल्वेतून कराडला गेला. आपल्या माहुलीच्या रेल्वे स्टेशनवर मोठा स्टंट केला. पुढे कराड आणि माहुली या दोन्ही स्टेशनचा काय कायापालट केला? केवळ शोबाजी केली, काहीतरी बदल झाला का? 15 वर्षे खासदार होता पण, केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा अथवा कराडवरून साधी नवीन, जलद रेल्वे तुम्हाला सुरु करता आली नाही असे अनेक सवाल त्यांच्या कामाबद्दल उपस्थित केले गेले आहेत.

साताऱ्याची हद्दवाढ कोणी अडवली

सातारा पालिकेला जेवढा निधी मिळाला आहे त्यातील 95 टक्के निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाला आहे. केंद्रातून काय मिळालं? साताऱ्याची हद्दवाढ जिल्हा परिषदेत कोणी अडवून ठेवली होती? तुमच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी तुम्ही हा प्रश्न रखडून ठेवला होता त्याला राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून मीच घेतली. हाच तुमचा विकास होता का? असा त्यांनी हद्दवाढीविषयचा सवाल उपस्थित केला आहे.

चहा पिऊन विकास होत नसतो

शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढे म्हटले आहे की, नुसतं मंत्र्यांना भेटून फोटो काढून आणि त्यांचा चहा पिऊन विकास होत नसतो हे सातारकरांना चांगलंच माहिती आहे. नुसतं फोटोसेशन करू नका सातारकरांसाठी खरंच काहीतरी आणा.

कोणाचा 1 रुपयाही बुडवला नाही

ज्या बँकेच्या भ्रष्टाचाराची पुंगी सारखी वाजवताय ती बँक आता कायदेशीररित्या मर्ज केली गेली आहे. कोणाचा 1 रुपयाही बुडवला नाही. उलट बँक मर्ज होऊ नये आणि लोकांची अडचण सुटू नये म्हणून शक्य तेवढे प्रयत्न तुम्ही केले पण, तुम्हाला यश आले नाही. एवढा तुम्हाला भ्रष्टाचार दिसतोय तर ज्या अजिंक्यतारा कारखान्याच्याबाबतीत नेहमीच गरळ ओकत असता त्या कारखान्याच्या निवडणुकीला पॅनेल का उभे केले नाही? छाती काढून यायचं होतं ना सभासदांच्या पुढं. कोणी अडवलं होतं? तुमच्या पत्रकबाजीने तुम्ही केलेली कुकर्मे लपणार नाहीत. आरोप प्रत्यारोप करायची मला इच्छा नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.