Udayanraje Bhosale : स्पष्टवक्ते, बिनधास्त, गाड्या-घोड्यासह राजेशाही थाट, कोण आहेत उदयनराजे भोसले?

Satara Lok Sabha Constituency : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याचा गड पु्न्हा एकदा जिंकला. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली. नगरसेवकपदापासून सुरु झालेला हा राजकीय प्रवास दिल्लीतील संसदेपर्यंत जाऊन पोहचला आहे.

Udayanraje Bhosale : स्पष्टवक्ते, बिनधास्त, गाड्या-घोड्यासह राजेशाही थाट, कोण आहेत उदयनराजे भोसले?
बिनधास्त, बेधडक उदयनराजेंवर तरुणाई फिदा
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 4:48 PM

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज, उदयनराजे भोसले हे साताऱ्यातच नाही तर राज्यात लोकप्रिय आहे. बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यासाठी ते ओळखले जातात. सर्वसामान्यांत लिलया मिसळण्याची, त्यांना आपलं करण्याची त्यांची हतोटी अनेकांना भावते. भावनिक स्वभावामुळे ते लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. कॉलर उडविण्याच्या त्यांच्या स्टाईलवर तरुणाई एकदम फिदा आहेत. सर्वसामान्यांना ते आपले वाटतात, हीच त्यांची मोठी जमेची बाजू आहे.

नगरसेवकापासून कारकिर्दीला सुरुवात

राजेशाही कुटुंबातील असले तरी त्यांची राजकीय कारकीर्द नगरसेवकापासून सुरु झाली. त्यानंतर एक एक पायरी चढत त्यांनी मोठा पल्ला गाठला. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात ते भाजपमध्ये आले. पण पुढे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2009-2019 या कालावधीत त्यांनी दिल्लीत या मतदारसंघाचे नेतृत्व केले. 2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागला. त्यांनी दोनच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता 2024 मधील लोकसभेत उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याचा गड राखला. उदयनराजे भोसले 32,771 मतांनी विजयी झाले. त्यांनी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केला.

हे सुद्धा वाचा

उदयनराजेंचे कुटुंब

24 फेब्रुवारी 1966 रोजी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा जन्म झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव दमयंती राजे आहे. त्यांच्या मुलीचे नाव नयनतारा तर मुलाचे नाव वीर प्रतापसिंह असे आहे. दमयंती राजे या अनेकदा मुंबई आणि पुण्यातील फॅशन पार्टीमध्ये दिसतात.

लोकांमध्ये एकदम लोकप्रिय

उदयनराजे हे जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत. ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. लोक त्यांना राजे या नावाने हाक मारतात. निवडणुकीच्या काळात ते जनतेत मत मागण्यासाठी जात नाही तर जनताच त्यांना समर्थन देण्यासाठी समोर येते, असे म्हटले जाते. देशात मोदींची लाट असताना पण 2014 मधील लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी 5 लाखांहून अधिक मते मिळवली होती. त्यापूर्वी 2009 मध्ये ते 3 लाखांहून अधिक मताने विजयी झाले होते. या भागातील लोकांना ते आपले कुटुंब मानतात. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. त्यांच्या लहान-मोठ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावतात.

उदयनराजे भोसले यांची संपत्ती किती?

लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार उदयनराजे भोसले यांनी 226 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या डोईवर 2.44 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये 31.64 लाख रुपयांचे वाहन कर्जाचा पण समावेश आहे.

महागड्या कार ताफ्यात

उदयनराजे यांना आलिशान कार आणि बाईकची भारी आवड आहे. त्यांच्या ताफ्यात अनेक आलिशान कार आणि महागड्या दुचाकी आहेत. त्यांच्या ताफ्यात जवळपास 10 वाहनं आहेत. उदयनराजे यांना अनेकदा स्कूटर, बाईकवर लोकांना भेटायला जातात.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.