Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Accident : नवी मुंबईहून जयसिंगपूरला चालली होती तवेरा गाडी, पण वाटेतच घात झाला !

सवाखंडे कुटुंब नवी मुंबईहून कोल्हापूरला चालले होते. मात्र साताऱ्याजवळ पोहचताच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि गावी पोहचण्याआधीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Satara Accident : नवी मुंबईहून जयसिंगपूरला चालली होती तवेरा गाडी, पण वाटेतच घात झाला !
साताऱ्यात तवेरा गाडीच्या अपघातात तीन ठारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 10:44 AM

सातारा / 2 6 ऑगस्ट 2023 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकानजीक तवेरा गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकळी घडली. नवी मुंबईहून जयसिंगपूरकडे निघालेल्या तवेरा गाडीचा अचानक टायर फुटल्याने तवेरा गाडी समोर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या बोलेरो पिकअपला धडकली. या अपघातात तवेरा गाडीतील एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू जागीच झाला. निखिल श्रीकांत सवाखंडे, प्रियांका निखिल सवाखंडे, शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. अपघातात 4 जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.

तवेरा गाडीचा टायर फुटल्याने अपघात

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवी मुंबई येथून जयसिंगपूरकडे निघालेल्या तवेरा गाडीचा साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असणाऱ्या कणसे हुंडाई शोरूम जवळ अचानक टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे गाडी समोर कोल्हापूरकडे निघालेल्या बोलेरो पिकअप टेम्पोला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यात गाडीत प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

अपघात एवढा मोठा भीषण होता की, यामध्ये तवेरा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....