Satara Murder : सातारा हादरलं! अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकल्याला काकानेच विहिरीत टाकून ठार मारलं

Satara Crime News : हे निर्दयी कृत्य करणाऱ्या चुलत्याचं नाव अक्षय मारुती सोनावणे असं आहे. संशयित आरोपी असलेल्या अक्षय मारुती सोनावणे याला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय.

Satara Murder : सातारा हादरलं! अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकल्याला काकानेच विहिरीत टाकून ठार मारलं
धक्कादायक हत्याकांड...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 12:40 PM

सातारा : साताऱ्यात (Satara Crime News) दहा महिन्याच्या निरागस चिमुरड्याची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चिमुरड्याच्या काकानेच त्याचा जीव (Satara Murder) घेतला. या खळबळजनक घटनेनं संपूर्ण सातारा जिल्हा हादरुन गेला आहे. शनिवारी सकाळी ही काळीज हेलावून टाकणारी घटना समोर आली. घरगुती वादातून काकाने निष्पाप आणि निरागस दहा वर्षांच्या मुलाचा जीव घेतला. चॉकलेट देतो असं आमीष लहान मुलाला दाखवलं. त्याला घराबाहेर बोलावलं आणि विहिरीत ढकलून दिलं, असा प्रकार या चिमुरड्याच्या काकाने केलाय. उलट्या काळजाच्या या काकाविरोधात साताऱ्यात संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने चिमुरड्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून आरोपीलाही पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतलंय. सध्या सातारा शहर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

काकाचं हडळकृत्य!

सातारा शहराच्या एमआयडीसी परिसरात शनिवारी काळी साडे आठ वाजण्याच्या सुमारात ही धक्कादायक घटना घडली. दत्तनगर कोडोली या गावात दहा महिन्यांच्या चिमुकल्याला चुलत्याने घरगुती वादातून विहिरीत फेकून दिलं. हे निर्दयी कृत्य करणाऱ्या चुलत्याचं नाव अक्षय मारुती सोनावणे असं आहे. संशयित आरोपी असलेल्या अक्षय मारुती सोनावणे याला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. सध्या पोलीस अक्षय सोनावणे यांची कसून चौकशी करत आहेत.

चॉकलेटचं आमीष

घरगुती वादाचा राग मनात धरुन अक्षयने त्याच्या चिमुकल्या पुतण्याला चॉकलेटचं आमीष दाखवलं. मुलाला घराबाहेर बोलवलं आणि विहिरीत टाकून दिलं, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेत निष्पाप चिमुरड्याचा जीव गेलाय. दहा महिन्यांच्या मुलाचा जीव गेल्याचं कळल्यानंतर त्याच्या नातलगांनी एकच आक्रोश केलाय. स्थानिकांनी मदतीने पोलिसांनी या मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून पोलिसांनी तो पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवलाय. या घटनेनं सातारा शहरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

हे सुद्धा वाचा

का केलं हडळकृत्य?

सातारा शहर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून संशयित आरोपी असलेल्या मुलाच्या काकाला ताब्यात घेतलंय. त्याची कसून चौकशी केली जात असून आता त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरतेय. सातऱ्याचे पोलीस निरीक्षत भगवान निंबाळकर यांनी याबाबतची माहिती दिलीय.

पोलिसांनी एका विहिरीत बाळ मृत अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. मयूर मारुती सोनावणे यांचं हे बाळ असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. या बाळाला महेश यांचाच सख्ख भाऊ अक्षय याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आले आहेत. अक्षयचे आईवडील त्याला त्रास देत होते. त्याचा राग कुणावर तरी काढायचा, यासाठी या मुलाचा खून करण्याचा कट अक्षयने रचल्याचं समोर आलंय.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.