AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : राहीबाई यांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरीब कुटुंबातल्या मुलांना शिक्षण दिले

सातारा – कर्मवीर भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांनी रयतच्या शिक्षण संस्थेच्या (Rayat Educational Institute) कामासाठी आयुष्य वेचले आहे. त्याचबरोबर त्यांनी गरीब कुटुंबातील मुलांना प्राधान्याने शिक्षण दिले आहे. त्यांना त्या काळात शिक्षण महत्त्व अधिक जाणवलं होतं. तसेच ज्ञान प्राप्तीची संधी देणे हे आण्णांचे प्राथमिक सुत्र होते. त्यामुळे अण्णांनी ज्ञान दानासाठी आयुष्य खरची घातले. आण्णांनी लावलेले रोपटे […]

Sharad Pawar : राहीबाई यांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरीब कुटुंबातल्या मुलांना शिक्षण दिले
माझ्याकडून दुसऱ्यांदा राहीबाईचा सत्कार होत आहे Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 1:19 PM
Share

सातारा – कर्मवीर भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांनी रयतच्या शिक्षण संस्थेच्या (Rayat Educational Institute) कामासाठी आयुष्य वेचले आहे. त्याचबरोबर त्यांनी गरीब कुटुंबातील मुलांना प्राधान्याने शिक्षण दिले आहे. त्यांना त्या काळात शिक्षण महत्त्व अधिक जाणवलं होतं. तसेच ज्ञान प्राप्तीची संधी देणे हे आण्णांचे प्राथमिक सुत्र होते. त्यामुळे अण्णांनी ज्ञान दानासाठी आयुष्य खरची घातले. आण्णांनी लावलेले रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. राहीबाईचा सगळ्यांनी आदर्श घ्यायला हवा. कारण त्यांनी काहीचं शिक्षण नसून सुध्दा त्या सेंद्रीय शेतीचा एक आदर्श जनमानसामध्ये पोहोचवण्याचं काम करीत आहेत. आज अण्णा असते तर त्यांनी राहीबाईच्या पाठीवर दिली असती असं शरद पवार (Sharad Pawar) साताऱ्यातल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात म्हणाले.

माझ्याकडून दुसऱ्यांदा राहीबाईचा सत्कार होत आहे

“आज राहीबाईचा सत्कार होत आहे. माझ्याकडून दुसऱ्यांदा राहीबाईचा सत्कार होत आहे. एक बी-बीयनं त्याच्यावरून त्यांनी एक भूमिका घेतली. त्या भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी सेंद्रीय शेतीचा एक आदर्श जनमानसामध्ये पोहोचवण्याचं काम त्या करीत आहेत. राहीबाई या शेतकऱ्यांचं जीवन बदण्याचं काम करीत आहेत. विष विना बी ही त्यांची संकल्पना चांगली लोकांच्या पसंतीला पडली आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेली ही व्यक्ती शेतकऱ्यांचं जीवन बदल्याचं काम करीत आहे. आज राहीबाईच्या रूपानं आणि त्यांच्या कामाच्या रूपानं एक आदर्श पाहायला मिळतं आहे. आज समज अण्णा या ठिकाणी असते. तर अण्णांनी शाब्बासकीची थाप राहीबाईच्या पाठीवर दिली असती” असं म्हणत शरद पवारांनी राहीबाईचं कौतुक केलं.

शिक्षण देणं ही आपली जबाबदारी आहे

“कोरोनाच्या कारणामुळे आपल्याला एकत्र जमता आलं नाही. दोन वर्षाच्या गॅपमध्ये अनेक पुरस्कार द्यायचे राहून गेले आहेत. ते आज आपण या ठिकाणी दिले. त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला अधिक वेळ लागलेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतच्या शिक्षण संस्थेच्या कामासाठी आयुष्य वेचले आहे. त्याचबरोबर त्यांनी गरीब कुटुंबातील मुलांना प्राधान्याने शिक्षण दिले आहे. त्यावेळी ज्ञान प्राप्तीची संधी प्रत्येकाला मिळत नसते. ती देण्याचं काम अण्णांनी केलं आहे. शिक्षण देणं ही आपली जबाबदारी आहे, हे सुत्र आण्णांनी मनामध्ये ठेवलं. कसलाही विचार न करता त्यांनी आपलं संपुर्ण आयुष्य त्यांनी खर्ची घातलं आहे. त्याचाचं परिणाम म्हणजे आज ही देशातली एक महत्त्वाची संस्था झाली आहे. रयतच्या आज राज्यात 749 शाखा 4 लाख 46 हजार विद्यार्थी, तर 15 हजार शिक्षक कर्मचारी, एव्हढा मोठा संसार या संस्थेचा आपल्या राज्यात आणि शेजारच्या राज्यात उभारलेला आहे.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.