Video : माझी उंची मोठी म्हणून मी हवेत, जास्त टीका करू नका नायतर पोट सुटेल, उदयनराजेंचा पलटवार

भाजपचे आमदार शिवेंद्र राजे भोसले आणि भाजपचेच खासदार उदयनराजे भोसले एकाच पक्षात असूनही दोघांमधूनही विस्तव जात नाही. संधी मिळताच दोन्ही नेते एकमेकांना टोला लगावल्या शिवाय राहत नाहीत.

Video : माझी उंची मोठी म्हणून मी हवेत, जास्त टीका करू नका नायतर पोट सुटेल, उदयनराजेंचा पलटवार
उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर पुन्हा पलटवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 5:30 PM

सातारा : नगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले (Shivendra Raje Bhosle) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. भाजपचे आमदार शिवेंद्र राजे भोसले आणि भाजपचेच खासदार उदयनराजे भोसले एकाच पक्षात असूनही दोघांमधूनही विस्तव जात नाही. संधी मिळताच दोन्ही नेते एकमेकांना टोला लगावल्या शिवाय राहत नाहीत. साताऱ्यातील राजकीय वर्चस्वावरून या दोन्ही नेत्यांमध्ये कायम टशन (Udayanraje Vs Shivendra Raje) असते. आता पुन्हा हा संघर्ष चांगलाच पेटला आहे. उदयनराजे नेहमी हवेत असतात अशी टीका शिवेंद्रराजे यांनी केली होती, त्याला उदयनराजे यांनीही त्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

उदयनराजेंचा जोरदार पलटवार

उदयनराजेंचे काम नेहमी वाऱ्यावरच असते या टीकेला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, माझी उंची मोठी आहे, म्हणून मी हवेत असतो, तुम्हीही तेवढी उंची गाठून दाखवावी. शिवेंद्रराजेंना नेहमी टीका करण्याशिवाय काय येत नाही, त्यांनी खुशाल टीका करावी. मात्र एवढीही टीका करू नये की पोट फुटेल. असा टोला उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना लगावला आहे. त्यामुळे आता याला शिवेंद्रराजेंचेही जोरदार प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे. पाची बोटं सारखी नसतात, काही लोकांचा स्वभाव प्रेमळ असतो, काही लोकांना टीका केल्याशिवाय झोप येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

शिवेंद्रराजे काय म्हणाले होते?

साताऱ्यात एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये खासदार उदयनराजे यांनी हवेतून मोटारसायकलवरून एंट्री केली होती. या त्यांच्या एन्ट्रीवर बोलत असताना आमदार शिवेंद्रराजे यांनी सडकून टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले उदयनराजेंची ही एन्ट्री म्हणजे वाऱ्यावरची वरात आहे. त्यांचे काम हे नेहमीच वाऱ्यावरच असतं जमिनीला धरून कोणतेही काम उदयनराजे करत नाहीत. उदयनराजेंचे ती एंट्री म्हणजे स्वतःच्या कामाप्रमाणे होती अशी जोरदार टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण, काय म्हणाले कोश्यारी?

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शिवसैनिकांकडून केराची टोपली, कोरोना नियमांचे खुलेआम उल्लंघन

गरज पडली तर तुमचं धोतर फेडू, राज्यपाल महोदय माफी मागा! मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांचा इशारा

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.